नवरीला न सांगता उचललं, भर लग्नात नवरीने पाहुण्याच्या कानाखाली मारली व्हिडीओ व्हायरल.
लग्न म्हंटल कि नोकझोक आलि मस्ती मज्जा तर सुरूच असते मात्र एका पाठ्याला विनाकारण मार खावा लागला आह्रे, त्याची काही चूक नसताना तापड असणार्या नवरी बाईने त्या व्यक्तीची थोबाडीत मारली वरमाला घालताना एका पाहुण्यानं नवरीला डोक्यावर उचललं. पण ही बाब तिला फारशी आवडली नाही. परिणामी खाली ठेवताच तिनं त्याच्या जोरदार कानाखाली मारली. आता सगळ्यांसमोर मार खाल्लाय, तो सुद्धा नवरीचा, मग तो तरी कशा शांत होईल. मग या संतापलेल्या पाहुण्यानं पुढे काय केलं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा शॉकच व्हाल
तर त्याचं झालं असं की, वधु-वर एकमेकांना हार घालण्यासाठी सज्ज होते. तेवढ्यात नवरदेवाच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचललं. अर्थात ही बाब अनेक लग्नांमध्ये गंमत म्हणून केली जाते. आता नवरीला कोण उचलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. तेवढ्यात एक पाहुणा स्वत:हून पुढे आला अन् त्यानं नवरीला उचलून तिला हार घालण्यासाठी मदत केली. पण त्यानं न सांगता उचलणं हे नवरीला काही आवडलं नाहि ,
परिणामी रागाच्या भरात तिनं पाहुण्याच्या थोबाडीत मारली. आता सर्वांसमोर एवढा मोठा अपमान झालाय तर तो तरी कसा शांत बसणार? मग त्यानं रागाच्या भरात तिथेच उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका तरुणीच्या मुस्काटात मारली. अन् रागानं तिथून निघून गेला. हा सर्व गडबडीत त्या मुलीनं बिचारीनं उगाचच मार खाल्ला.
नेटकरी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एक जण म्हणतोय, की यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीची काय चुकी, तर दुसरा म्हणतोय न सांगता नवरीला स्पर्श करणं चुकीचं होतं, काही जणांनी तर हार घालताना उचलून घेण्याच्या प्रथेलाच दोष दिलाय. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात नेमकी चूक कोणाची होती?