महिलांनी शासकीय रुग्णालयास आपले माहेर समजावे.-श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे.
किनवट तालुका प्रतिनिधी/ मारोती देवकते
महाराष्ट्र शासन सार्वजनीक अरोग्य विभाग नांदेड जिल्हा यांच्या वतीने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे आभियान 26 सप्टेंबर ते 5 अक्टोंबर नवरात्रोउत्सव कार्यक्रमा अंतर्गत आज दि.29 सप्टेंबर रोजी अरोग्यवर्धिनी उपकेंद्र कमठाला येथे माननिय मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी तालुका आरोग्य आधिकरी डॉ. संजय मुरमुरे यांचा हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी एचबी, शुगर, ब्लड, थायरॉईड, उपस्थित सर्व महिलांची तपासणी स्त्री रोग तज्ञ सुनिल राठोड यांनी केली. तसेच श्रीमती वर्षाताई घुगे यांनी सर्व महिलांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व मार्गदर्शन केले ते पुढे बोलताना म्हणाल्या महिला ही संपूर्ण घराची तसेच आपल्या संपूर्ण परिवाराची काळजी घेत असते. आपली काळजी कुणी घेणार नाही हे तीला माहिती आसून सुद्धा आपले कर्तव्य ती पार पाडत असते. म्हणून आजचा या आधुनिक युगात आपण स्वतः नवदुर्गा बनुन आपल्या स्वतःची काळजी घेऊन आपण स्वतः व आपले बाळ कसे निरोगी राहू या वर जास्त भर द्यावा.
आपल्या शासकीय यंत्रणा आपल्या शेवेसाठी तत्पर आसुन प्रत्येक महीलेने दवखण्यात जाऊन उपचार घ्यावा व प्रत्येक शासकीय दवाखान्याला आपले माहेर घर समजावे आसे प्रतिपादन मॅडम यांनी या वेळी बोलताना केले. कार्यक्रमा मध्ये आलेल्या सर्व गरोदर महिलांची ओटी भरून त्यांना शुभेच्छा दिल्या..
त्यावेळी उपस्थित अधिकारी
डाॅ.संजय मुरमुरे ता.आ.अधीकारी
वैद्यकीय अधीकारी डाॅ.आईटवार
वैद्यकीय अधिकारी डाॅ.भाग्यश्री वाघमारे
आरोग्य सहाय्यक श्री आन्नेलवार सर
(अरोग्य उपकेंद्र कमठाला) चे सीएचओ डाॅ.पवार बी.यु.,
आरोग्य सेवीका हीवाळे एम.एम.,
आरोग्य सेविका आर जी.ढोरे,
आशा ताई पुणम भरकड,
आशाताई अरुणा गरड, तसेच गावातील गरोदर माता, स्तनदा माता, तसेच सरपंच आनुसया तडसे, ज्येष्ठ नागरिक शिवाजी पाटिल कऱ्हाळे, लक्ष्मण देवसरकर, मारोती सुरोशे, बालाजी भरकड मारोती भरकड, कैलास पाटील कऱ्हाळे, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटिल कऱ्हाळे, मारोती बराटे, वैभव गेडाम, कुलदीप उरकुडे, पंडित भरकड, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व सामजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाचा शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सर्व अधिकर्याना कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे प्रशस्तीपत्र देऊन आभिनंदन करण्यात आले