काल नगरच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन, आज पहिल्याच दिवशी या पुलावर झाले ढिशुम – ढिशुम, व्हिडीओ होतोय व्हायरल.

अहमदनगरचा महत्वकांक्षी असणारा उड्डाणपूलाचे उद्घाटन 19 नोव्हेंबर ला पार पडले, या भव्य दिव्य उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे देखील उपस्थित राहिले. त्यानंतर या उड्डाण पुलावर सायंकाळी मोठा लेजर शो देखील करण्यात आला होता. त्यामुळे हा उउड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे.
उड्डाणपुल रहदारीसाठी खुला केला आणि पहिल्याच दिवशी असे काही घडले की, हा उड्डाणपूल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . ह्या धक्कादायक घटनेमुळे अनेक जण चक्रावून गेले आहेत. पहिल्याच दिवशी या उड्डाणपूलावरती असं काही घडलं त्यामुळे उड्डाणपुलाला गालबोट लागल, हा पूल पाहण्यासाठी अनेक नगरकर पुलावरती येत होते. अनेक जण सेल्फीही काढत होते आणि याच दरम्यान या उड्डाणपूलावरती अगदी किरकोळ कारणावरून दोन वाहन धारकामध्ये वाद झाला.
या वादाचे रूपांतरण फ्रीस्टाइल हाणामारी मध्ये देखील झाल. आणि हाच व्हिडियो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. या वादाचे नेमकं कारण काय होतं, या वादातली मंडळी कोण आहेत ? याबद्दल कुठलीही माहिती मिळाली नाही. या मात्र हाणामारीचे चित्रीकरण उपस्थित नागरिकांनी केलं आणि हेच चित्रीकरण सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी भांडण झाले.
गेल्या पंधरा वर्षापासून नगरकर उड्डाणपुलाचे स्वप्न पाहत होते. आणि उड्डाणपूलाचे हा स्वप्न पूर्ण झाले. हा पूल नगरकरांसाठी २० नोव्हेंबरला रहदारीसाठी खुला करण्यात आला. त्यामूळे नगरकरांचा आनंद शीगेला पोहचला कारण नगरमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठ काम होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण आनंदात होता सगळेजण सोशल मीडियावरती उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे व्हिडिओज, स्टेटस ठेवत होते मात्र याच दरम्यान असा एक व्हिडिओ नगरमध्ये व्हायरल होऊ लागला ज्यानं उड्डाणपूलाच नाव कुठेतरी खराब होऊ लागला. रहदारीसाठी पहिल्याच दिवशी उड्डाणपूल खुला केला आणि पहिल्याच दिवशी या उड्डाणपूलावरती ही घटना घडली.