आईच्या तेराव्याच्या दिवशी मुलांने असं काही केलं, ते पाहून सर्व झाले अवाक्
Children did something like this on mother's thirteenth day, everyone was speechless...
आपल्या जवळची व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर जे दुःख होतं, त्या दुःखाला कुठली ही परिसीमा नसते. एखाद्याच्या कायमच्या जाण्यान एखाद्याच आयुष्य उध्वस्त होऊ शकतात, ती व्यक्ती जर आपली आईच असेल तर खऱ्या अर्थानं आपण पोरके होतो. मात्र या दुःखातही काहीतरी आदर्श ठेवावा. आपण लोकांच्या कामी यावं असं काम एका तरुणांने केल आहे. ही घटना भंडारा या ठिकाणी घडली आहे. मृत्यूनंतर दशक्रिया विधी, तेरावा , वर्ष श्राद्ध असे धार्मिक विधी केले जातात. काही ठिकाणी मोठा खर्च ही केला जातो, त्याचबरोबर अनेक रूढी परंपरा असतात, त्या पद्धतीने दानही केलं जातं मात्र या अश्या अनावश्यक सर्व खर्चांला एका तरुणांना आळा घातला.
‘मरावे परी किर्ती रुपी उरावे… असे म्हणतात, आईचे निधन झाल्यानंतर मुलाने आईच्या विचारांवर चालत एक आदर्श काम केलं. आईच्या तेरावा निमित्ताने गुरुदेव ने शाळेला डिजिटल साहित्य दान केल, यातून शिक्षणाचा दर्जा ही सुधारणार आहे. पारंपारिक रीती रिवाजाला फाटा देत त्याने एक आदर्श पाउल उचल , ते म्हणतात की आईने मला शिकवल्या म्हणून मी परदेशात जाऊन नोकरी करू शकलो, चांगले पैसेही कमवू शकलो,त्यामुळे गावातील मुलांनी ही शिक्षणा घेऊन मोठं व्हावं आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावं याच उद्देशातून भंडारा जिल्ह्यातील धोप या खेडेगावातील एका तरुणांना हे कृत्य केलं आहे.
मुलांना डिजिटल शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी शाळेला डिजिटल होण्यासाठी मोठी मदत केली आहे. मोहाडी वरून दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या धोप या गावातील रहिवासी गुरुदेव शेंडे यांची आई 57 वर्षीय यशोदा शेंडे यांचा मृत्यू झाला, मृत्यू नंतर तेराव्या दिवशी लोकांना तेरावीचे जीवनात देण्याची परंपरा असते. मात्र या तरुणांना असं न करता त्या परंपरेला फाटा देत तेरावी चा कार्यक्रम रद्द केला. तेराव्या कार्यक्रमाचा सर्व खर्च शाळेला डिजिटल करण्यासाठी वापरला, त्याने शाळेत एक लाख रुपयांची मदत केली . शाळेसाठी संगणक, प्रोजेक्टर अशा सुविधा मिळवून दिल्या. गुरुदेव शेंडे या तरुणानं आईचे ऋण फेडले.
त्यामुळेच त्याच्या आईचे नावातच सतत स्मरणात राहणार आहे. लोक तेरावीच्या जीवनात पैसे खर्च करतात, लोकांना जेऊ घालतात . मात्र याच पैश्याचा सद उपयोग करत. गुरुदेवांने शिक्षण मदत केली, त्यामुळे गावातील शाळेला फायदा होणार असे मुख्याध्यापक मनोहर भगत, उपसरपंच यांनी म्हटलं . खऱ्या अर्थाने एखाद्या रूढी परंपरेमध्ये पैसा खर्च करून तो वाया जाण्या पेक्ष्या लोकांच्या फायद्यासाठी खर्च करणं हा एक आदर्श संदेश आपल्या आयुष्यातील निमित्ताने या तरुणांना दिला.