लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आरटीओ कार्यालयास भेट

अहिल्यानगर :
लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेच्या नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या निमित्ताने संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री. सगरे साहेब यांची भेट घेऊन कार्यकारिणीची अधिकृत माहिती सुपूर्त केली.

या प्रसंगी संस्थेच्या वतीने श्री. विशाल गणपती बाप्पाची प्रतिमा भेट देऊन सगरे साहेबांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या नोंदणी पत्रासह पदाधिकाऱ्यांची यादी सादर करण्यात आली. सगरे साहेबांनी याबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि स्कूल बस व लक्झरी वाहनांबाबत मार्गदर्शन केले.
✍️ पुढील प्रमाणे कार्यकारणी आहे
- अध्यक्ष – शिवाजी उबाळे
- उपाध्यक्ष उपनगर – अमोल भांड
- उपाध्यक्ष – प्रमोद बेदमुथा
- सेक्रेटरी – रियाज मुलानी
- खजिनदार – गणेश गावकवाड
- सचिव – ईश्वर धोका
- सहसचिव – धर्मा वाघस्कर
- प्रवक्ते – सरवर कुरेशी
- संघटक – गणेश उपाध्ये

या भेटीत अध्यक्ष शिवाजी उबाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने बोलताना सांगितले की, “शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि लक्झरी बस मालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील.”

या औपचारिक भेटीत आरटीओंनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे संस्थेला पुढील कार्यासाठी दिशा मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. शेवटी संस्थेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सगरे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानत व नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या .