ऑगस्ट 2022 पासून युट्युब होणार बंद ??

दैनंदिन जीवनामध्ये युट्युबने सर्वांच्या आयुष्यामध्ये महत्वाचा वाटा घेतलेला आहे. आपण छोट्या गोष्टी पासून तर मोठ्या गोष्टी पर्यंत युट्युबचा वापर करतो. एखादी गोष्ट करायची असल्यास युट्युबचा वापर करतो. आणि सध्या युट्युब वरून पैसे देखील कमावले जातात. पण आता युट्युब युजर्स साठी एक वाईट बातमी येत आहे. यूट्यूब 2016 मध्ये स्वस्त फोनसाठी हलकं व्हर्जन YouTube go app म्हणून लॉन्च करण्यात आलं होतं ते आता ऑगस्ट 2022 पासून बंद करण्याचा निर्णय युट्युब घेतला आहे.
यूट्यूब च्या म्हणण्यानुसार आपल्याला युट्युब चा आनंद घ्यायचा असेल तर आपण वेब ब्राऊजरच्या माध्यमातून युट्युब चा वापर करू शकता किंवा गूगल प्ले स्टोर वरून जे मुख्य यूट्यूब आहे ते आपण इन्स्टॉल करून ते वापरू शकतो असं युट्युब कडून सांगण्यात आला आहे. YouTube Go App बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे साधा मोबाइल होता विशेष करून हे app त्यांच्यासाठी बनवले गेले होते साध्या मोबाईल धारकांसाठी आणलेलं एक पर्याय एप्लीकेशन होतं आणि या ॲप मध्ये बरेच फिचर्स दिले गेले नव्हते त्यामध्ये सांगायचे झाले तर थोडक्यात या व्हर्जनमध्ये कमेंट करणं, पोस्ट करणं, कन्टेन्ट क्रिएट करणे यासारखे फिचर्स दिले गेले नव्हते कारण हे यु ट्यूब चे लाईट वर्जन होते.
हे ॲप अशा काही युजर साठी लॉन्च करण्यात आलं होतं जिथे कनेक्टिव्हिटी चा प्रॉब्लेम आहे, डेटा कमी व डिवाइस सारख्या कारणांमुळे YouTube च्या ग्राहकांचा एक्सपिरीयन्स प्रभावित झाला होता. परंतु आता यूट्यूबने ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि अशातच युट्युब ने आता कनेक्टिव्हिटी असणाऱ्या डिवाइस मध्ये चांगल्या प्रकारे काम करण्याचा दावा देखील केलेला आहे. युट्युब प्रवक्त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार एन्ट्री लेवल डिव्हाइसेस असेल त्या ठिकाणी युट्युब पाहणाऱ्यांच्या स्थितीत देखील सुधारणा केलेली आहे आणि वेळोवेळी युट्युब अपडेट होत असते, युट्युब स्वतःला अपडेट करत असतात सध्या युट्युब गो एप्लीकेशन ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे याचे युजर आहेत त्यांना दुसऱ्या ॲप मध्ये अपलोड करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे किंवा आपण युट्युब वापरण्यासाठी एखादा चांगला फोन देखील देऊ शकतो.