लग्नासाठी काहीही; भरपावसात पूराच्या पाण्यातून नवरदेवाचा ” इतक्या ” किलोमीटर प्रवास.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. आजकालच्या काळामध्ये लग्न आठवणीत राहावं आपलं लग्न सगळ्यात हटके होण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बऱ्याचदा राज्यातले, परराज्यातले, देशातले, विदेशातले असे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल. यामध्ये कधी वर काहीतरी अनोखं करतो तर कधी वधू वेगळ्या पद्धतीने एन्ट्री करते. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात त्याचबरोबर लग्न लावणारी मंडळी आहेत ते देखील लग्न वेगळ्या पद्धतीने व्हाव आटोकाट प्रयत्न करत असतात. तुम्ही म्हणाल की लग्न वरती एवढी चर्चा का ?
कारण ही असंच आहे हा ट्रेंड आहे पावसाळ्याचा बऱ्याचदा आपण म्हणतो गुडघ्याला बाशिंग बांधून नवरदेव तयार असतो. आणि याचीच प्रचिती खरी झाली याचे कारण की, हा नवरदेव इतक्या तयारीत होता की या ठिकाणी नदीपात्रात पूर आला आहे त्या पुराच्या पाण्यातून तो रस्ता काढत आपल्या वधूकडे पोहोचला. आणि दिलवाले दुल्हनिया हम ले जायेंगे यासारखे अनेक हिंदी सिनेमांमध्येही वराच्या एन्ट्री साठी वेगवेगळे गाणी असतात. वराती असतात मात्र ही वरात अत्यंत हटके आहे ही वरात पावसापाण्याचा आहे, की पुराची आहे. मात्र हि वरात कायमस्वरूपी वरच्या आणि वधूच्या लक्षात राहणारी आहे. कारण की निसर्ग जेव्हा कहर करतो तेव्हा सर्वजण पाहतच राहतात. मात्र आपल्याला जे करायचं आहे ते देखील मनुष्यप्राणी करतच असतो. या भर पावसात हा लग्न सोहळा पार पडला. पावसाळ्यातल्या या लग्नाची गोष्ट पाहुयात सविस्तर.
ही घटना नांदेड मधील आहे. नांदेड मधील पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे चक्क या नवरदेवाला सात किलोमीटर पायी जायची वेळ आली आहे. आणि या नवरदेवाची वरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार चालू आहे. आणि यामुळे नांदेड मधील हदगाव तालुक्यात पैनगंगा कयाधू नदीला पूर आला आहे. पावसामुळे नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक मार्गही बंद करण्यात आले आहे. हदगाव मधील युवक शहाजी रोकडे यांचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चिंचोली येथील गायत्री घोंगडे या युवतीची जमला. 14 जुलै रोजी हळद कार्यक्रम होता आणि लग्न 15 जुलै रोजी ठरलं आहे पण मागील काही दिवसापासून नांदेड मध्ये तुफान प्रमाणात पाऊस चालू आहे. आणि पाऊस जास्त असल्यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. हदगाव उमरखेड हा मार्ग बंद झाला आहे. पण या नवरदेवाने ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न ठरला आहे त्याच तारखेला करायचं. आणि या नवरदेवाने पुराच्या पाण्यातूनच वरात काढली. करोडी पासून ते चिंचोली पर्यंत आता तब्बल ७ किलोमीटरचा प्रवास केला आहे. हा त्याने थर्माकोलच्या सहाय्याने लग्न स्थळी पोहोचला. हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आणि आज या नवरदेवाचे लग्न होणार आहे.
बातम्यांमध्ये आपण पाहिले आहे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण आहे. ते रुद्ररूप आपणास पाहायला मिळाले आहे. पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. आणि या मुळे रस्ते देखील खराब झाले आहेत. रस्ते खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढला आहे. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे असे धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी बंदी घातली आहे. आणि या परिसरात कलम 144 लागू केला आहे. त्याचप्रमाणे सर्व तालुक्यात शाळा 14 ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.