कळा सुरू असताना शौचालयाच्या बाजूला बसून तिला का करावा लागला ७ तासाचा प्रवास ?
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व याला अत्यंत महत्त्व असतं. आणि या मातृत्वासाठी अनेक वेदना सहन कराव्या लागतात असं म्हटलं जातं. आई होणं सोपं नाही आई होण्याचा जो प्रवास आहे तो अखंड नऊ महिन्यांचा असतो. यामध्ये त्या आईला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. नऊ महिन्यानंतर जो दिवस येतो तो म्हणजे प्रस्तुतीचा दिवस, स्त्रियांचा एका जिवणात तीन वेळा जन्म होतो. तो म्हणजे जेव्हा तिचा पहिल्यांदा जन्म होतो, त्यानंतर तिचं लग्न होऊन, आणि त्यानंतर तिला मूल होणार असत तेव्हा प्रसूतीच्या वेळी अनेक असहाय्य वेदनांचा सामना करावा लागतो. आणि त्यातूनच ती एका गोंडस बाळाला जन्म देते. मात्र प्रसूतीच्या वेळी ज्या काही चुका होतील त्याचा त्रास या स्त्रीला जन्मभर भोगावा लागतो. प्रसूतीच्या वेळी आरोग्य सुविधा मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
चंद्रपूर जिल्ह्यातील रंजनी तलांडे यांच्याबाबत मात्र असं काही घडलं नाही. या गर्भवती मातेच्या धाडसी प्रवासाला प्रत्येक जण सलाम देतोय. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. 14 जुलैला मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी सात वाजता यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आशा सेविका लता गेडाम यांच्या मदतीला आल्या. ग्रामीण रुग्णालयात गडचांदूर येथे पोहोचवलं परंतु डॉक्टरांनी रेफर टू राजुरा असं म्हटलं आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांच्याकडे चिठ्ठी हातात मिळाली आणि परिवाराला तर धक्काच बसला.
पुर परिस्थितीमध्ये सर्व मार्ग बंद होते. रंजनी यांना त्रास होत होता या पुरातून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात कसं घेऊन जायचं हे मोठं संकट कुटुंबियांच्या समोर होता. जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे परिवाराचे चिंता वाढली. चुनाला येथील माणिकड रेल्वे स्टेशन ने बल्लापुर जायचं आणि तिथून चंद्रपूर भर पावसात कुटुंबानी रेल्वे स्टेशन गाठले. वेदनादायी गर्भवती रंजनी तलांडे यांनी धीर न सोडता प्रवास सुरु झाला. माणिकगड स्टेशन गाठले परंतु तिथे थांबा असणारी एकही गाडी उपलब्ध नव्हती शेवट स्टेशन मास्तर यांना विनंती करून सिकंदराबाद दानापूर गाडीतून बल्लारपूर स्टेशन पर्यंत अश्या परिस्थिती असतांना सुद्धा डब्यात शौचालय च्या बाजुला खाली बसुन तिला बल्लारशहा स्टेशन पर्यंत प्रवास करावा लागला.
ज्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी दोन तास लागत होते त्यांना सात तासाचा प्रवास करावा लागला. पोलीस बल्लारपूर स्टेशनला पोहोचल्या नंतरच शासकीय रुग्णालय चंद्रपूर त्यांना पोहोचण्यासाठी रात्रीचे दीड वाजले. सात तास प्रवास करून पंधरा तारखेला त्यांनी सकाळी जुळ्या गोंडस बाळांना जन्म दिला. या संपूर्ण प्रवासात अशा सेविका लता गेडाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एका गर्भवती आईला घेऊन जाते तिची काळजी करणे, तिला धीर देणं हे लताताई यांनी जबाबदारीने पार पाडलं. गडचांदूर याठिकाणी रंजनी यांना जर वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांची प्रसूती त्या ठिकाणी करण्यात आली असती. मात्र ज्या ठिकाणी दोन तासाचा प्रवास होता त्या ठिकाणी त्यांना सात तास अशा स्थितीमध्ये प्रवास करावा लागला. आणि त्यानंतर रुग्णालयात पोहोचून आपल्या बाळांना जन्म द्यावा लागला. असह्य वेदनांना कवटाळून हा प्रवास या मातेने केला आणि त्यानंतर यात आपल्या बाळाचा चेहरा बघून त्यांचा हा प्रवास कुठेतरी थांबला.