” हे मंदिर तुमच्या समाजाच नाहीये… ” पाहा सविस्तर बातमी.

मंदिर प्रवेशाचा महाराष्ट्राला इतिहास आहे. काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा आंदोलन छेडला होता. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन नव्हतं तर दुजाभाव केला होता. तो खोडून काढण्यासाठीचे आंदोलन होता. समाजातला जातीभेद नष्ट व्हावा यासाठी हे आंदोलन त्यांनी ठेवला होता मात्र अजूनही येथे जातीवादी लोक त्यांचे विचार घेऊन समाजात विकृती पसरवत आहेत.
याची प्रचिती पुन्हा पुन्हा येते कारण मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामणी येथील जाणा माता मंदिरात अनुसूचित जातीचा असल्याने प्रवेश नाकारून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पीडित यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानोरा येथील संतोषीमातानगर पंकज कंठाळे हे त्यांच्या सासरवाडीत राहतात.
त्यांची सासू आशाबाई यांनी धाम येथील जाणा माता मंदिरात दर्शनासाठी चालण्यास सांगितले. त्यानंतर ते दोघे जण मोटरसायकलींना मंदिरात गेले. तिथे गजानन महाराज मंदिरा समोर असलेल्या किशोर पाटील आणि गजानन ठाकरे यांनी मंदिर तुमच्या समाजाचं नाही, असं सांगून पंकज आणि आशाबाई यांना मंदिरात जाऊन नाही दिला. तसेच धक्काबुक्की करून शिवीगाळ केली त्याच वेळी जगदीश गाढवे हे देखील त्या ठिकाणी आले दोघांनीही लोखंडी रॉड ने मारहाण केली यात आशाबाई या जखमी झाल्या तर पंकज यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ते घाबरून त्यांच्या गावी अमरावतीला निघून गेले.
मात्र या घटनेची तक्रार पंकज कंठाळे यांनी मानोरा पोलिस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी गजानन ठाकरे किशोर पाटील जगदीश गाढवे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला कारंजा पोलीस अधिकारी या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश हे करत आहेत. येथील मंदिरात प्रवेश नाकारल्यास आडनाव केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र सध्या आधुनिक विचार मात्र अजूनही आधुनिक राहिले नाही. अजूनही काही ठिकाणी मंदिर प्रवेशाला नाकारले जाते हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.