ब्रेकिंग : सर्वसामान्यांना दिलासा, CNG आणि PNG गॅस तब्बल एवढा रुपयांनी कमी, आज रात्रीपासून नवे दर लागू.

एकीकडे विविध प्रकारचे जीवन आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत. आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडला आहे. दैनंदिन जीवनामध्ये लागणारे वस्तू दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मध्यंतरी तूर डाळीचे रेट हे गगनाला भिडले आहेत. त्यातच आता महानगर गॅस लिमिटेड ने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे.
बरेच दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचे दरामध्ये वाढ होताना आपण पाहत आहोत. त्यामुळे बऱ्याच जणांचा कल हा सीएनजी कडे वाढला होता. पण काही दिवसापूर्वी महानगर गॅसनेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये भाव वाढ केली होती.
पण आज रात्रीपासून महानगर गॅस सीएनजी व पीएनजीच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज रात्रीपासून नवे दर लागू होतील. मिळालेल्या माहितीनुसार महानगर गॅसने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांची तर पीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो ४ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे गॅसच्या वाढलेल्या किमती नक्कीच नियंत्रणात येतील.
काही दिवसापूर्वी गॅसच्या किमती कमी होण्याबाबत एक बातमी आली होती, त्यामध्ये केंद्र सरकारने उद्योगांना मिळणारा काही नॅचरल गॅस दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर यासारख्य गॅस ऑपरेटर ना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे .त्यामुळे सीएनजी व पीएनजी च्या वाढत्या किमती रोखण्यात मदत झाली.
जीवन आवश्यक वस्तूंची किंमती वाढत असताना महानगर गॅस लिमिटेड ने सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये सीएनजी ६ रुपयांनी तर पीएनजीच्या दरामध्ये ४ रुपयांनी कपात केली आहे आणि हे तर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.
याबाबत माहिती देताना महानगर गॅस कडून सांगण्यात आली की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर या किमतींमध्ये कपात करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सीएनजी मध्ये ६ रुपये तर पीएनजी मध्ये ४ रुपयांची कपात केली आहे. या कपाती नंतर मुंबईमध्ये सीएनजी 80 रुपये दराने तर पीएनजी 48.50 पैसे या दराने विक्रीसाठी उपलब्ध असेल.