राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी सभागृहात पहा हे काय केलं ? पहा बातमी सविस्तर.
राष्ट्रवादीचे सॉफ्ट किलर नेते जयंत पाटील यांच्या सभागृहातील भाषणांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सगळ्याच नेत्यांना खुदुखुदु हसायला आलं. जयंत पाटील नेमकं काय म्हणत होते टोमणे त्याचबरोबर स्पष्टपणा आणि जो संदेश द्यायचा तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम यावेळी जयंत पाटलांनी अगदी उत्तम पद्धतीने केला. शालेतून जोडे मारणं ज्याला म्हणतात तसाच प्रकार या ठिकाणी घडत होता. याचा अनुभव दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई या सगळ्या नेत्यांना आला…!
मिश्किलपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी आमची अपेक्षा होती. सुरत गुवाहाटीचा प्रवास केल्यावर तेच मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटायचं. पण भाजपने त्यांना डायरेक्ट ‘सीएम इन वेटिंग’ केलं… म्हणजे ज्या नेत्याला पंतप्रधान होण्याचा योग भविष्यकाळात येऊ शकतो, असं आम्ही समजत होतो. त्या नेत्याला उपमुख्यमंत्री करुन महाराष्ट्राच्या एका नेत्याचा भाजपने अपमान केला.” असं म्हणत जयंतरावांनी फडणवीसांच्या जखमेवरची खपली काढून त्यांना आणखी वेदना दिल्या.
42 दिवस अख्या महाराष्ट्रन वाट पाहून जे मंत्रिमंडळ स्थापित झालं, त्या मंत्रिमंडळात काय खलबद झाली आहे. अगदी विनोदशीर भाषेत जयंत पाटलांनी यावेळी सांगितलं “खातेवाटपात काय झालं… आमच्या चंद्रकांतदादांवर किती अन्याय….उच्च आणि तंत्रशिक्षण खातं त्यांना दिलं.. मलाच वाईट वाटतंय… मंत्रिमंडळात एकच ध्रुवतारा आहे तो म्हणजे गुलाबराव पाटील… त्यांचं पाणीपुरवठा खातं कुणालाही बदलता आलं नाही… सगळ्यांची खाती बदलली पण त्यांचं खातं कुणाला बदलणं शक्य झालं नाही. आमचे शंभूराज देसाई…. किती तुमची बाजू घ्यायचे पण त्यांनाही एक्साईज डिपार्टमेंट दिलं….”, अशा शब्दात खातेवाटपावर जयंतरावांनी तिरकस बाण सोडले.
या सगळ्यांमध्ये जयंत पाटलांनी नवी मुंबईचे आमदार मंदा म्हात्रे यांनाही सहभागी करून घेतल, जयंत पाटलांच्या खातेवाटपावरील टोल्यांवर मंदा म्हात्रे म्हणाल्या, एक्साईज खातं चांगलं आहे.. त्यावर पुन्हा जयंत पाटील म्हणाले, “कसं काय चांगलं आहे…? अच्छा गणेश नाईकांकडे एक्साईज खातं होतं, त्यामुळे मंदाताई तुम्हाला ते खातं चांगलंच वाटणार..”
“जयंतरावांनी अतिशय मोजक्या शब्दात शिंदे-फडणवीसांच्या सरकार वर तिरकस बाण सोडले.