13 वर्षांच्या आर्यनसाठी खाकी ठरली “विघ्नहर्ता” पाहा नेमक काय घडलं होत ? पहा बातमी सविस्तर.

खाकीला तुम्ही बऱ्याचदा नकारात्मक भावनेतून पाहिलं असेल, मात्र हीच खाकी कधीकधी माणुसकीचे दर्शनही घडवते. ही बातमी पोलीस दला बद्दलची आहे. गंभीर आणि खंबीर कडक शिस्तीत असणारे खाकी वर्दीतले पोलीस कर्मचारी हे प्रत्येकालाच खूप डॅशिंग वाटतात किंवा त्यांची भीती वाटते, भरदस्त आवाज, कणखर स्वभाव अशी ही पोलिसांची ओळख आहे. मात्र याच पोलिसांमध्ये माणुसकी ही पाहायला मिळते.
वारजे भागातील गोकुळ नगर या ठिकाणी वसंत साठे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात, घरासमोर मोकळ्या पटांगणात सायंकाळचे चारच्या सुमारास गवतातून चालताना तेरा वर्षे मुलगा आर्यन याच्या अंगठ्याला सापाने चावला सर्पदंश केल्याचे लक्षात आले, त्यानंतर वडिलांनी दुचाकी वरती बसून त्याला रुग्णालय जाण्यासाठी निघाले. मात्र खंडोजी चौकापर्यंत आल्या नंतर त्यांना गर्दीतून पुढे जाता येत नव्हते, काही रस्ते ही वाहतुकीसाठी बंद होते.
गणेश उत्सवाच्या दरम्यानचा हा काळ होता. तिथे बंदोबस्तासाठी असणारे उत्तम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे आणि पोलीस कर्मचारी संदीप सांगळे व कोथरूड वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी समीर यांनी वसंत साठे यांची मदत केली. सर्पदंश झालेला आर्यन बेशुद्ध अवस्थेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी परिस्थितीचा गांभीर्य ओळखलं, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी पोलीस कर्मचारी संदीप सांगळे यांना आर्यनला तात्काळ पोलीस वाहनातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याच्या आदेश दिले.
पोलीस कर्मचारी संदीप यांनी गर्दीतून सायरन वाजवत वाजवत वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यातील बॅरिगेट काढत, पोलीस वाहनातून आर्यनला तात्काळ ससून रुग्णालयात पोहोचवल, त्यामुळे आर्यनचे प्राण वाचले, सध्या आर्यनची प्रकृती ठीक आहे. त्यामुळे वडिलांनी या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोमन आभार व्यक्त केले. पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आर्यनचे प्राण वाचले. पोलीस कर्मचारी कडकं बंदोबस्त ठेवतात, अनेक निर्बंध घालतात मात्र संकट काळी हेच पोलीस कर्मचारी देवदूत म्हणून आपल्या समोर उभे राहतात.