धक्कादायक : लहान मुलांना उचलून नेणारे चोर समजून, पहा या गाववाल्यांनी त्या साधूंची काय अवस्था केली.
काही दिवसापूर्वी पालघर या ठिकाणी काही साधूंना चोर समजून मारहाण केल्याने खुनाचा प्रकार घडला होता. अगदी असाच काही लवंगा या ठिकाणी घटना घडता घडता टळली. सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात मथुरा येथून देवदर्शनासाठी चार साधू आले होते तर त्यांना सांगली मध्ये एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला याबद्दल आपण जाणून घेऊ,
उत्तर प्रदेश मधून कर्नाटक मध्ये देवदर्शनासाठी काही साधू गेले होते, त्यानंतर ते विजापूर हून जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी रात्रीच्या सुमारास गावांमधील एका मंदिरात मुक्काम केला. त्यानंतर सकाळी हे चारही साधू गाडीतून निघाले असता, एका मुलाने रस्ता विचारला आणि यातूनच ग्रामस्थांना ही टोळी मुले चोरणारी असल्याचा संशय आला. त्यानंतर या ग्रामस्थांनी साधूकडे चौकशी केली. चौकशी कर करत असताना साधू व ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला यामधून संतप्त ग्रामस्थांनी साधूंना गाडीच्या बाहेर काढून बेदम मारहाण केली या साधूंना लाठी काठी पट्ट्याने जबर मारहाण केली.
सदरच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. या साधूकडे चौकशी केली असता या साधूंच्याकडे मिळालेले आधार कार्ड त्यानंतर संबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखाड्याचे साधू असल्याचे समोर आला आहे. आणि हे मुलं पळवणारी टोळी नसून खरे साधू असल्याचं स्पष्ट झालं.
याबाबतीत साधूंनी मोठ्या मनाने ग्रामस्थांच्या विरोधामध्ये कोणतीही तक्रार न करता, हा सगळा प्रकार गैरसमजुती मधून घडल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात कोणाचीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही. या सगळ्या नंतर साधूंनी पंढरपूरकडे देवदर्शनासाठी प्रस्थान केले मात्र या सर्व मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.
सुदैवाने पालघर सारखी घटना होता होता टळली आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट. कोणताही निर्णय घेण्याआधी एकदा त्याबद्दलची पूर्णतः माहिती घेणे महत्त्वाचा आहे. तसेच कोणतेही गैरसमज न करता सगळ्या गोष्टींची शहानिशा होईपर्यंत असे चुकीचे प्रकार होणे टाळले पाहिजे. आज या ठिकाणी पालघर सारखी घटना होत होता टळली आहे.