तोफखाना पोलीस अत्याचाराची फिर्याद घेण्यास करत आहे टाळाटाळ; अखेर पिडीत कुटुंबाने केली अधीक्षकाकडे मागणी.

अहमदनगर शहरात देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत, तसेच पोलीस देखील काही आरोपींना साथ देतात असे आरोप केले जातात. अशीच एक घटना अहमदनगर शहर उपनगरातील तोफखाना पोलिस ठाण्यात घडली आहे. या ठिकाणी अत्याचाराची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली असल्याची तक्रार पीडित कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकड़े निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे केलेल्या निवेदनाची दखल अधीक्षक साहेब घेणारं का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीडित कुटुंबाने दिलेल्या निवेदनात आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तोफखाना हद्दीतील राम ससाणे नामक आरोपीने गाडीवर बसून नेले होते. तद्नंतर त्याने पुन्हा अल्पवयीन मुलीला आणून सोडले आणी घडलेल्या घटनेची माहिती कुणालाही सांगितल्यास संबधित मुलीचे फोटो व्हायरल करून त्या कुटुंबातील सदस्यांना जिवंत ठार मारण्याची धमकी दिली होती.
मात्र अत्याचार झाल्याने शांत व घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलीने अखेर तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचे सागितले. असे झाल्याचे सांगितले असतांना देखील तोफखाना पोलिसांनी अत्याचाराची फिर्याद न घेता पदाचा गैरवापर करत दुसरीच फिर्याद लिहिली असल्याची तक्रार निवेदनामध्ये या पिडीत कुटुंबाने केली आहे.
दरम्यान राम ससाणे नामक आरोपीवर तोफखाना पोलिसांनी ३६३ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने ससाणे नामक आरोपीला पोलिस पाठीशी घालत आहे अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक नेमका काय निर्णय घेतात, आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा नोंदविला जाईल का हे पहायचे आहे.