एकमेकांच्या अंगावर पेट्रोल बॉम्ब फेकत होते; एकाच्या हातातून निसटून त्याच्याच पँटवर पडला अन्…

आपण बऱ्याचदा पाहतो की, तरुण मंडळींना स्टँड करायला खूप आवडत असतं. त्यांना असं वाटत असतं की, यामुळे ते खूपच पुढारलेले व मित्रांमध्ये त्यांची खूपच वाहवा होईल. पण आपण पाहतो की, बऱ्याचदा असं घडत नाही उलट याच्या अगदी विरुद्ध काहीतरी घडते. आणि यामुळे बऱ्याचदा तरुण गंभीर जखमी देखील होतात. तर कित्येकांनी आपले प्राण देखील गमावले आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.
अशीच काहीशी घटना एक ठिकाणी घडली आहे. काही मुले शाळा सोडून स्टंट करत असताना त्यांच्यासोबत एका प्रकार घडला आहे. या तरुणांना वाटलं की, त्यांना कोणीही पकडू शकणार नाही पण अखेर ते पकडले गेले. त्यामुळे त्यांचं नाव देखील शाळेतून काढण्यात आला आहे.
या मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हि घटना उत्तर प्रदेशमधील आहे. येथील एका शाळेत शिकणारी काही मुले शाळा सोडून जंगलात मजा मस्करी करत फिरत होते आणि ते एकमेकांवर पेट्रोल बॉम्ब फेकत होते. यावेळी एका मुलाचे मोठे नुकसान झालेले या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. एका मुलाच्या हातातून पेट्रोल बॉम्ब पडल्याने त्याच्या स्वतःच्या कपड्यांमध्ये आग लागली. हि आग लागल्यानंतर कशी तरी विझवण्यात आली.
मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा मोठ्या प्रमाणामध्ये भाजला होता. हा सर्व प्रकार शाळेजवळच्या जंगलात घडला. त्याच ठिकाणी काही अंतरावर दोन विद्यार्थी दिसतात आणि दोघेही पेट्रोल बॉम्ब जंगलात फेकत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच शाळेने या मुलांवर कारवाई केली आहे. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार स्टंट करणारे विद्यार्थ्यांची नावे शाळेमधून देखील काढले आहेत. तसेच यांच्या कुटुंबीयांना कळवला आहे. दुसरीकडे पोलिसांनीही घटनास्थळी येऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.