अवघ्या ३५ मिनिटांत हृदय बदल; पाहा ” त्या ” डॉक्टरांची कमाल, पहा बातमी सविस्तर.
हृदयाशी सहसा कोणी खेळत नाही कारण अत्न्त्य नाजूक अवयव असतो , मात्र हृदय शरीराचा केंद्रबिंदू असतो , हृदय बदलन एवढ सोप्प काम असत का ? नाही मात्र ठाण्यात अस घडल आहे फक्त अवघ्या ३५ मिनिटांत हृदय बदल गेल त्याला कारण ही तसेच आहेत.
ठाणे जिल्ह्यातील हृदय प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया ज्युपीटर रुग्णालयाने यशस्वी केली असून कोकणातील ३९ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याला चक्क दुसरे हृदय लावण्याची किमया केली आहे. ज्युपीटर रुग्णालयाचे डॉक्टर नितिन बुरकुले याबाबत सांगतात की ”ही अवघड शस्त्रक्रिया डॉ. प्रविण कुलकर्णी, डॉ. सौम्य शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ८ वरील हृदयरोग तज्ज्ञांनी पार पडली.
३ ऑगस्टला भिकाजी यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करुन २४ ऑगस्टला मध्यरात्री ४ वाचताच त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सरकारच्या विभागीय समितीमार्फत मुंबईच्या नानावटी रुग्णालयातील ५९ वर्षीच रुग्णाचे हृदय उपलब्ध झाले. त्यांनतर मुंबई आणि ठाणे पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करुन अवघ्या ३५ मिनीटांत हृदय ठाण्यात आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
ही ठाण्यातील पहिलीच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेसाठी एसटीकडून महामंडळाकडून काहीच मदत मिळू शकली नसल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं. मात्र, कोकणातील गावकऱ्यांनी आणि काही ट्रस्टच्या साह्याने तब्बल ४० ते ५० लाख जमा झाले आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्ण व त्याच्या कुटुंबियांनी ज्युपिटर रुग्णालयाचे आभार मानले.