सोयगाव येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य नागरी सत्कार समारोह संपन्न .
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.2, माझ्या राजकीय जीवनात सोयगावकरांनी मला कायम साथ दिलेली आहे. त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही असे स्पष्ट करीत कार्यकर्ते, मित्र परिवार यांचे प्रेम व भक्कम पाठिंब्यामुळे आयुष्यात संघर्ष करण्यासाठी ऊर्जा मिळते असे प्रतिपादन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे आयोजित नागरी सत्कार सोहळा प्रसंगी केले.
डोंगर रांगेतील सोयगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी दिली.
सोयगाव शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच विवीध संघटनांच्या वतीने शहरातील पंचायत समिती आवारात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
तालुक्यातील डोंगर रांगेतील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण साधण्यासाठी तालुक्यात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून शेतकऱ्यांनी चिंता करु नये, कृषी विभागाच्या पोखरा योजनेत सोयगाव मधील अधिकाधिक गावांचा समावेश करण्यात येईल. शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी तालुक्यात सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
दसरा मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे नगर विकासमंत्री असतांना त्यांनी सोयगावच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी दिला. पिण्याच्या पाण्यासाठी योजना मंजूर करून दिली. सिंचन व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेसह येथील प्रशासकीय इमारत बांधकामासाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे जनसामान्यांचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी दि. 5 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, नगर पंचयातीतील शिवसेना गटनेता अक्षय मगर, मा. जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, माजी पंचायत समिती सभापती धरमसिंग चव्हाण, दारासिंग चव्हाण, सयाजी वाघ, नितीन बोरसे, बाबू चव्हाण, शिवापा चोपडे, श्रीराम चौधरी, संजय मापारी, एड. योगेश पाटील, नगरसेवक संध्याताई मापारी, कुसुम राजू दुतोंडे, लतीफ शहा, भगवान जोहरे, राजू घनगाव, हर्षल काळे, कफिर शहा, दीपक पगारे, संदीप सुरडकर, विष्णू इंगळे, अशोक खेडकर, शेख रउफ , गजानन कुडके,दिलीप देसाई,यांच्यासह महिला आघाडीच्या धृपताबाई सोनवणे, सुरेखाताई तायडे, सुशीलाबाई इंगळे, सलीम पठाण,अ. लतीफ देशमुख, भरत राठोड, सांडू राठोड, जीवन पाटील, दत्तू इंगळे, फिरोज पठाण, भारत तायडे, नंदू सोळंके,कुणाल राजपूत, शमा तडवी,रवींद्र पाटील, विलास वराडे, रशीद पठाण, हर्षल देशमुख, अमोल मापारी,वसंत राठोड,सुरेश चव्हाण, नामदेव,सोनने,विजू तायडे,जाकेर शेख, ऐलियास भाई, उस्मान पठाण, मखाराम राठोड, मनोज शेवगण, विष्णू वाघ, सुपडू पाटील,गजानन बडक, संजय आगे, अनिल ठाकरे, शिवदास राजपूत, शेख मुबारक आदिंसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनेचे अध्यक्ष सदस्य, विविध गावातील आजी माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या संघटनेच्या वतीने करण्यात आला सत्कार
सोयगाव तालुका शिवसेना, युवासेना, व महिला आघाडी, सोयगाव नगर पंचायत, तिरूपती अर्बन पतसंस्था सोयगाव, व्यापारी महासंघ सोयगाव, अमृतेश्वर शिक्षक सहकारी पतसंस्था सोयगाव, पंचायत समिती कार्यालय सोयगाव, पोलीस पाटील संघटना सोयगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती सोयगाव, सोयगाव तालुका मच्छिमार संस्था सोयगाव, सोयगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ , राज्य कृषी साहाय्यक संघटना सोयगाव तसेच सोयगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायटी, आजी माजी सरपंच आदींनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार केला.