एका व्यक्तीने मुलाला चालत्या रेल्वेतून बाहेर फेकलं; धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO आला समोर.
सोशल मिडियावर अनेक व्हिडियो तुम्ही पाहत असाल, त्या व्हिडियो तुम्हाला हैराण करणार आहे कारण एका माणसाने एका मुलासोबत खूप वाईट केलं आहे. राग आला म्हणून कोणी अस वागत नाही जसा हा माणूस वागला, ट्विटरवर हा व्हीडीयो आढळला आहे, यात काही न काही कारवाई केली जाईल यात शंका नाही. एवढा क्रूर व्हीडीयो तुम्ही कधी पहिला नसेल, चालू ट्रेन मध्ये काय घडल त्या मुलाला धावत्या ट्रेन त्या मुलाला ढकलून दिल.
बस असो वा ट्रेन जागेवरून किंवा धक्का लागण्यावरून भांडणं झाल्याचं तुम्ही पाहिलंच असेल. काही वेळा तर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचतो. अशाच एका ट्रेनमधील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक पुरुष आणि एका मुलामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला, त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली आणि रागात त्या व्यक्तीने मुलाला चालत्या ट्रेनमधूनच ढकलून दिलं आहे.
ट्रेनमधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक पुरुष आणि एक मुलगा दरवाजाजवळ बसले आहेत. त्यांच्यामध्ये वाद होतो हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचतो. मुलगा त्या व्यक्तीच्या कानशिलात मारतो. मग काय व्यक्तीला इतका राग येतो की ती त्याला थेट धक्काच देते.
चालत्या ट्रेनमधून ती व्यक्ती मुलाला ढकलून देते.ट्रेन इतकी भरधाव आहे की त्या मुलाचा जीव गेलाच असावा. यानंतर व्यक्ती गप्पपणे ट्रेनच्या आत येते. जसं काहीच झालं नाही. अगदी निवांत, शांतपणे ती बसते. ही घटना कोणत्या ट्रेनमधील, कधीची आणि कुठली आहे माहिती नाही. @gharkekalesh ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.काही सेकंदाच्या त्या व्हीडीयोने अनेकजण हैराण झाले आहेत.