व्हायरल

प्रियकराच्या नावाचा चेहऱ्यावर टॅटू, पोटात मूल; अचानक ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडची पहा कशी झाली अवस्था.

सध्या लोकांना काही तरी हटके करायला आवडतं. या गोष्टीला रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीदेखील अपवाद नाहीत. एका महिलेनं प्रेमात पडल्यावर अशीच एक हटके गोष्ट केली; पण आता तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय. सध्याच्या काळात टॅटू काढणं ही फॅशन खूपच लोकप्रिय आहे. शरीरावर आपल्या आवडीच्या डिझाइनचे टॅटू अनेक जण काढतात.

सध्या टॅटू काढणं ही एक सामान्य फॅशन आहे. अनेक जण आपल्या आवडीच्या डिझाइनचे टॅटू काढून घेतात. काही जण आपली प्रेयसी किंवा प्रियकराच्या नावाचा टॅटू काढतात; पण काही वेळा असं करणं चुकीचं ठरतं. नैर्ली नझमच्या बाबतही असंच काहीसं घडलं. रिलेशनशिपमध्ये असताना या महिलेनं तिच्या गालावर टॅटू म्हणून पार्टनरचा चेहरा काढला; पण विचित्र गोष्ट अशी घडली की तो टॅटू अजूनही त्या महिलेच्या चेहऱ्यावर असला, तरी पार्टनरने तिच्यासोबतचं नातं तोडलं आहे.

महिलेनं आपल्या गालावर प्रियकराचा चेहरा टॅटू म्हणून काढला; पण काही दिवसांतच त्यांचा ब्रेकअप झाला. या महिलेच्या चेहऱ्यावर हा टॅटू मात्र कायम असून, तिच्यावर चेहरा झाकून वावरण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ही महिला लवकरच तिच्या सोडून गेलेल्या प्रियकरापासून होणार असलेल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे या महिलेबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

तिने ब्रेकअपचा किस्सा शेअर करताना सांगितलं, आमचं सर्वकाही सुरळीत चाललं होतं. आम्ही दोघांनी घरदेखील खरेदी केलं होतं. सर्व काही सुरळीत असताना अचानक माझ्या प्रियकरानं नातं तोडलं आणि तो निघून गेला. ब्रेकअपनंतर नैर्लीनं तिचा टॅटू फ्लॉंट केला आणि एक दिवस माझा पार्टनर नक्कीच परत येईल, असं सांगितलं.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!