वेगाने जाणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार, पहा हि घटना कुठे घडली आहे.
अप्घात्च्या बातम्या तर आपण ऐकल्या असतीलच अश्यातच अपघाताची एक बातमी हिंगोली जिल्ह्यातून समोर येते. रस्ते गुळगुळीत झाल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना वेग मर्यादेवरती नियंत्रण राहील सोबतच नियमांची पायमल्ली होताना देखील पाहायला मिळते. तसेच वाहन मद्य सेवन करून चालवणे हे अशी अनेक अपघातांची कारणे असू शकतात. हिंगोली मध्ये तर अपघातांच्या परी सीमाच सगळ्या ओलांडलेल्या आहेत. कारण रोज एक अपघात ऐकायला मिळतोय.
अनेकांना रस्ता अपघातामध्ये आपला जीव देखील गमाव लागतो मात्र प्रशासन तरीही गांभीर्याने या गोष्टीकडे पाहत नाहीये. कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरती माळेगाव पाटील नाशिक वेगात येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. माधव कल्याण कस्तुरे वय वर्ष 38 असा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंधार तालुक्यातील पोखरणी येथील माधव एका महिन्याभरापासून कळंबोली परिसरामध्ये मंदिराच्या बांधकामासाठी येत होते आपल्या दुचाकीवरून ते कळमनुरी कडे येत होते त्यांची दुचाकी कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरती माळेगाव पाटी जवळ आली असताना आज कळमनुरी कडून आखाडा बाळापूरकडे जाणाऱ्या वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये त्यांचा जागेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटना ठिकाणी दाखल झालं. मयत माधव यांचा मृतदेह कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला आहे, दरम्यान माधव हे नेमक कोणत्या गावात काम करत होते हे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत नव्हतं. त्यामुळे पोलीस मयत माधव यांच्या भ्रमणध्वरीवरून तपास घेत ते कुठल्या गावाला काम करत होते याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.