नमाजाला गेलेल्या व्यक्तीवर काळाचा घाला; काही क्षणांतच नको ते घडले. पहा सविस्तर व्हिडिओ.
हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अनेक ठिकाणी आपल्यात असणारी व्यक्ती क्षणात आपल्याला सोडून जाते, जीवन जगण्याच्या पदधती बदल्या आहेत, या बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. शरीर हे आजाराच घर बनत असत त्यामुळे अचानक हृदयविकार येऊन अनेक जन मृत्युमुखी पडतात. नागापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
शहरातील जाफरनगर मशिदीत गुरुवारी नमाज अदा करण्यात येत होती. यावेळी एक व्यक्ती अचानक खाली कोसळली. त्यानंतर उपस्थितीत इतर सर्वजण त्याच्या मदतीसाठी धावले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सदर व्यक्तीने जागीच प्राण गेले आहे. मशिदीत मृत्युमुखी पडलेली व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून आजारीच होती. उपचारासाठी ते नागपूरला आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होते.
मशिदीत नमाज पठण करण्यासाठी गेले असताना त्यांना मृत्यूने गाठलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे व लोकही आपापल्या पद्धतीने यावर कमेंट करत आहेत.
आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या , हृदयविकारापासून दूर रहा, संतुलित आहार घेऊन जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात रहा. व्यायाम करा