शेती : शिंदे – फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी आणली ही नवीन योजना; शेतकऱ्यांना मिळणार ” एवढे ” अनुदान.
फडणवीस आणि शिंदे यांचे नव सरकार पहिल्या दिवसापासूनच अनेक निर्णय घेत आहे. त्यामुळे हे सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष असतं. आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना याच धर्तीवर राज्यात आता मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला. शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
कृषी विभाग सोबतच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती देखील समोर येते. कृषी विभागाच्या बैठकीत हा निर्णय जारी झाला असला तरी अर्थसंकल्पात योजनेसाठी किती रुपयांची तरतूद केली जाते हे अद्यापही समोर आलं नाहीये. पण सरकारी याबद्दलची देखील अधिकृत घोषणा लवकरच करेल.
तसेच मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा अनुदान दिलं जाईल. सध्या देशपातळीवरती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. आणि या धर्तीवर ते राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाणार असं सांगण्यात येते.
यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्यात शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याचे निकश अद्यापही समोर आले नाहीयेत. मात्र मागील तीन दिवसापासून विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.