” नवनीत राणा आता तुला मी सोडणार नाही. ” पोलीस पत्नी वर्ष भोर, पहा काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर.
अमरावतीमध्ये राजकारण, पोलीस स्टेशन आणि लव जिहाद हा जो मुद्दा होता, यावर चांगलं रनकंद माजले. कारण राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन खासदार नवनीत राणा यांनी चांगला राडा केला होता सोबत त्यांनी मुलीच्या आईलाही घेऊन गेल्या होत्या. पोलिसांवर आक्रमक होत आक्रमक भाषा केली होती. पोलिसांनी देखील यांना इथून बाहेर काढा असे म्हंटले होते.
हात वारे करून आक्रमक होऊन अनेक घडामोडी त्यावेळी तिथे घडल्या आणि त्याठिकाणी पोलीस स्टेशन मधील घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल ही झाली. मात्र आता या सगळ्या प्रकरणात लव जिहाद असा मुद्दा आहे असं म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा या तोंडघोषी पडल्यात. कारण 19 वर्षे युवती ही बेपत्ता किंवा तिचा अपहरण झालं किंवा लव जिहाद आहे असं काहीही नसताना घरच्यांच्या रागामुळे मी घरातून निघून गेले होते असं त्या मुलीने येऊन सांगितलं आहे.
आणि त्यामुळे या सर्व प्रकरणावरती पडदा पडला. चार दिवसानंतर ती मुलगी घरी पोहोचली. युवक युवतीला डांबून ठेवला असा आरोप खासदार यांनी केला होता मात्र तसं काहीही झालं नव्हतं. ती मुलगी कोणासोबतही पळून गेली नव्हती. किंवा तिला डांबूनही ठेवला नव्हतं त्यामुळे त्या मुलीने देखील माध्यमांसमोर येऊन माझी बदनामी थांबवा मी माझ्या शिक्षणासाठी बाहेर पडले होते असं सांगितलेलं आहे.
मात्र खासदार नवनीत राणा यांचा जो आक्रमकपणा होता, याचा आता समाचार प्रत्येक जण घेत आहे. यामध्ये शिवसेना पदाधिकारी आणि पोलीस पत्नी वर्षा भोयर यांचं एक वक्तव्य सोशल मीडियावरती व्हायरल होतं आहे. त्यांनी नवनीत राणा यांना सणसणीत इशारा दिला आणि एक मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नवनीत राणा तुला शेवटचे संधी देते तुला खरच माणुसकी असेल ना तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग, नाहीतर तुला मी सोडणार नाही.
तू पोलिसांच्या काळजाला हात घातला आहेस, दिवस-रात्र कोरोना सारख्या काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडले आहे. तुला पोलिसांचे दुःख कळणार नाही पोलिसांबद्दल अप शब्द तू नेहमीच वापरतेस असं पोलीस पत्नी वर्षा भोयर म्हणाल्या आहेत त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापलेल असं देखील दिसत आहे.