माहेरी गेलेली बायको नांदायला येत नाही म्हणून हा पठ्ठ्या चक्क टॉवरवर चढला, व्हिडीओ होतोय व्हायरल.
तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना अशी गत झाली आहे, बायको नांदायला येत नाही म्हणून तरुण चढला, ही अजब घटना जुन्नरमध्ये घडलीनवरा बायकोचं भांडण काही नवं नाही. घराघरात नवरा बायकोचे वाद पाहायला मिळतात. पण वेळीच मिटवायला हवे अन्यथा घटस्फोटापर्यंत प्रकरण जाऊ शकतं असा सल्ला जेष्ठ मंडळी देतात. असचं अजब प्रकरण समोर आलं आहे. रुसलेली बायको माहेरून परत येत नाही म्हणून वैतागलेला नवरा थेट वीजेच्या टॉवरवर चढला.
जो पर्यंत बायको परत येणार नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही असा निश्चय त्याने केला होता. नवऱ्याचा हा शोले स्टाईल स्टंट सध्या इंटरनेटवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.ही अजब घटना जुन्नरमध्ये घडली आहे. केशव काळे असं या नवऱ्याचं नाव आहे. नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे रुसलेली बायको माहेरी निघून गेली.
पण आता तिची समजूत काढल्यानंतर देखील ती सासरी यायला तयार नाही. अखेर बायको परत यावी म्हणून हा पठ्ठ्या चक्क विजेच्या हायवॉल्टेज टॉवरवर चढला. या तरुणाला खाली उतरवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आला. पण जोपर्यंत बायको परत येत नाही तोवर खाली उतरणार नाही असा निश्चयच त्याने केला. २ बैलांचा वाद रिक्षाच्या मुळावर उठलाय, ‘ही’ हाणामारी पाहून हसू आवरणार नाही
अखेर जुन्नर पोलिसांनी माहेरी जाऊन त्याच्या बायकोला परत आणलं. मग बायको प्रेमी नवऱ्याला खाली उतरवून दोघांचे वाद सोडवले. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या बायको प्रेमी नवऱ्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय तर काहींनी मात्र त्याच्यावर टीका केली आहे.