सोयगाव येथे कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुल, सोयगाव येथे १० वे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल मध्ये शुक्रवार (दि.१७) रोजी शालेय विद्यार्थ्यांचे 10 वे वार्षिक स्नेहसंमेलन” उत्साहात पार पडले या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक व प्रतिमापुजन दिपप्रज्वलन सोयगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक श्री अनमोल केदार कार्यक्रमाचे अध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिरिष पवार तर प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष रवींद्र काळे, कृष्णा पाटील, ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश यादव संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे डॉ प्राध्यापक दादासाहेब पवार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस ,व्यवस्थापक एकनाथ कोलते यांच्या रविंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्नेहसंमेलनात पालकांना व विद्यार्थ्यांना केदार साहेब यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुमचे ध्येय व तुमच्या अंगी असणारे सुप्त गुण हे महाराष्ट्रात चमकले पाहिजे असे मार्गदर्शन केले .कार्यक्रमात इ.ज्यु.केजी ते नववी पर्यंत च्या विद्यार्थांनी देवा श्री गणेशा, गाडी घुंगराची , शिवाजी महाराज यांचा पोवाडा, देशभक्ती गीत व नाटीका , बेटी बचाव , बेटी पढाव ,सुंदर अशा गीतांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता
या स्नेहसंमेलनाचे सुत्रसंचालन शालेय विद्यार्थींनींनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस यांनी केले या कार्यक्रमासाठी पालक, बंधु, भगीनी, प्रतिष्ठीत नागरिक, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक अंजली कथलकर, शितल काटोले,योगेश काळे, मनिषा पाटिल, जयश्री श्रीवास्तव, शितल पवार आशा पंडित,प्रणय कुलकर्णी, विद्या पाटिल, नम्रता पाटिल, नलिनी पाटील, रोहिणी पाटील ,प्रेरणा मोरे,या स्नेहसंमेलनाचे सुत्रसंचालन शितल पवार यांनी केले तर आभार प्रेरणा मोरे यांनी मानले.