पोलीस दलातील चंद्रशेखर यादव, ज्योती गडकरी, राजेंद्र सानप, राहुल सानप व शमुवेल गायकवाड यांना पुरस्कार जाहीर..
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत रविवारी (दि.14 नोव्हेंबर) रोजी होणाऱ्या कार्यक्रमात नागरिकांना सुरक्षा व निर्भय वातावरण ठेवण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलातील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, उद्योजक बाळासाहेब शहाणे आदी पाहुणे उपस्थित राहणार आहे.
तसेच या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात योगदान देऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार्थी म्हणून अनिता काळे, डॉ. सुलभा पवार, प्रतिभा खैरनार, सखाराम गोरे, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, संजय पुंड, शबनम डफेदार, विनोद पाठक, किशोर वाघुले, जावेद शेख, गोदावरी दयाडे, बस्वराज दयाडे, आदीनाथ दहिफळे, अफसर पठाण, लिलावती जंजीरे, अन्वर शिकलगर, हेमंत सोनवणे, सुनिता जाधव, मिनहाज शेख, विजय मोरे, शिवदास कांबळे, माया काळण, आशा सोनवणे, इंदूमती सोनवणे, नितेश पवार, बाबा टकले, नितू सिंह, कल्पना निंबोकार, वैशाली कंकाळ, कौसल्याबाई म्हस्के, सुधीर पवार, शिवस्वराज्य बहुद्देशीय संस्था, फरहत अंजुम शेख, चंदा मोटघरे, वैदेही मेंगदे, अफसर पठाण, नलिनी भुजबळ, दिलावर शेख, रुपेश माळी, शांता मरकड, माधुरी कर्डे, विकास झेंडे, प्रा. गुलशन जमादार, अशोक भालके, हबीब शेख यांना सन्मानित केले जाणार आहे.