नायलॉन व चिनी मांजा पासून दुचाकीस्वारांचे संरक्षण व्हावे यासाठी डॉ अमोल बागुल यांनी बनवला प्राणार्क..

पतंगाच्या मांजाबरोबरच ॲसिड, चाकू, काठी तसेच हिंस्र प्राणी हल्ल्यापासून रक्षण करणार संशोधक शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी बनवलेले “प्राणार्क.”
संशोधनाच्या प्रात्यक्षिकासाठी डॉ.बागुल यांनी शोधली गंमतीदार “टेस्टी बलून” पद्धत
अहमदनगर-नायलॉन व जीवघेण्या चिनी मांजापासून दुचाकीस्वारांना पतंगांच्या दिवसात संरक्षण मिळावे त्याचबरोबर रस्तालुटीच्या प्रकरणात काही ठिकाणी आडव्या तारा बांधल्या जातात यापासून संरक्षणाबरोबरच ॲसिड,चाकू,काठी, हिंस्र प्राणी हल्ल्यापासून देखील संरक्षण मिळावे म्हणून येथील पाच राष्ट्रपतींद्वारा निमंत्रित व सन्मानित संशोधक शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी दूचाकीस्वारांसाठी हॅण्डलला लावण्यासाठी” प्राणार्क” – अर्धवर्तुळाकार रॉड तयार केला यामुळे अनेक अपघात टळून जीवितहानी होणार नाही.
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(DRDO) ला प्राणार्क चे संशोधन डॉ. बागूल यांनी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सादर केले असून या संकल्पनेच्या निर्मितीचे पेटंट,ट्रेडमार्क,कॉपीराइट,आय.एस.ओ.,जागतिक विश्वविक्रम प्रमाणीकरण व अधिकार जगभरातील जॅकेट व दूचाकी निर्मिती कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत देण्याचे डॉ.बागुल यांनी जाहीर केले आहे.
प्राणार्क म्हणजे प्राण वाचवणारा आर्क व आर्क म्हणजे गणितातील( )कंस हे चिन्ह होय.या कंसाप्रमाणे हा प्राणार्क रॉड दिसतो.२०० ग्रॅम वजनाचा प्राणार्क रॉड हा साधारणत: दीड ते दोन फुटांचा धातूचा पोकळ पाईप असून यावर रात्री चमकणारे रेडियम डकवण्यात आले आहे .त्यावर मांजा अडकुन तूटण्यासाठी अणकुचीदार खाचा देखील तयार करण्यात आल्या आहेत.रॉड वॉटरप्रुफ असून दुचाकीस्वाराचा डाव्या बाजूच्या आरशाच्या नटबोल्टमध्ये हा रॉड काही सेकंदांमध्ये सहजपणे बसवता येतो व काढताही येतो. यासाठी अंदाजे खर्च ७० रुपये येतो. प्राणार्कमुळे अपवादात्मक परिस्थितीत लोखंडी धारदार शस्त्राचा कमीत कमी पहिला-दुसरा वार निकामी देखील होऊ शकतो व पिडीताला स्वसंरक्षणासाठी संधीची वेळ मिळू शकते.
जगभरातील सुमारे 33 देशांतील 150 प्रकारच्या दुचाकी निर्मितीची रचना व डिझाईन करणाऱ्या “कोड ऑफ व्हेईकल डिझाईन” (वाहन रचना आरेखन संहिता अधिनियम) आस्थापने यांना देखील नवीन दुचाकी रचना आरेखन करताना या संशोधनाचा आग्रहाने समावेश करावा तसेच नवीन दुचाकी विकत घेतानाच ग्राहकाला इतर ॲक्सेसरीजबरोबर दुचाकीबरोबर हे प्राणार्क आग्रहाने देण्यात यावे व पतंग महोत्सवानुसार ग्राहकांनी वापरावे,असे आवाहनही त्यांनी सदर कंपन्यांना केले आहे.तसेच नितिन गडकरी(केंद्रीय रस्ते ,वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री), मा.एकनाथ शिंदे (मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्यासह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,आर.टी.ओ.-मोटार वाहन विभाग,महाराष्ट्र आदी ठिकाणी देखील हे संशोधन ऑनलाइन पाठवले आहे.अहमदनगर महानगरपालिकेचे पर्यावरणदूत म्हणून बागुल कार्यरत आहेत.
प्राणार्क संशोधनाच्या प्रात्यक्षिकासाठी डॉ.बागुल यांनी “टेस्टी बलून” ही पद्धत शोधून काढली. दुचाकीस्वार गाडीवरून जाताना प्राणार्क रॉडमुळे मांजा तुटतो हे प्रात्यक्षिक लांबून मांजा डोळ्याला दिसत नसल्यास कसे दाखवता येईल असा प्रश्न पडल्यावर मांजाला गॅस बलून/हायड्रोजन वायूचे फुगे पताकांप्रमाणे लावून त्यादिशेने दुचाकीस्वाराने गाडी चालवून प्राणार्क रॉडच्या खाचांमुळे मांजा तुटतो हे व्हिडिओमध्ये दिसते/दाखवता येते. “टेस्ट” करण्यासाठी या मांज्याला लावलेले ” गॅस बलून” वापरले म्हणून डॉ.बागुल यांनी या पद्धतीला “टेस्टी बलून” असे गंमतीदार नाव दिले.
“भारतीय तिरंगा ध्वज व जगाला अहिंसेचे तत्त्वज्ञान देणारा जैन धर्माचा पवित्र ध्वज यावरून प्राणार्क हे प्राणाची हिंसा होऊ न देणारे नाव व या रॉडच्या रेडियम सजावटीतील या दोन्ही ध्वजांचे रंग विराजमान आहेत.शाळेमध्ये सहावीच्या इतिहासातील वर्धमान महावीरांच्या पंचमहाव्रतांतील अहिंसा हे पहिले व्रत विद्यार्थ्यांना शिकवताना प्राणार्क रॉडची कल्पना सुचली असे डॉ.बागुल यांनी सांगितले.नायलॉन,चिनी व घातक मांगूस मांजा निर्मिती, वितरणास प्रतिबंध लावणे एकट्या-दुकट्याला शक्य नाही,घातक मांजाची निर्मिती करून सर्वसामान्य नागरिकांचे जीव घेणे हा एक प्रकारचा गुन्हा व देशद्रोहच आहे असे वाटते.यास पायबंद घालणे जरुरीचे आहे.असे प्रतिपादन डॉ.बागुल यांनी केले आहे.