विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
मातोश्री पाणंद रस्ता विकास योजनेसह विविध विकास कामांसाठी 12 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी
दि.7, कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव तालुक्यातील ठाणा, फर्दापूर, धनवट, वरखेडी तांडा, जंगला तांडा, फर्दापूर तांडा, सोयगाव, गलवाडा, वेताळवाडी या गावात मातोश्री पाणंद रस्ता विकास योजनेसह विविध विकास कामांसाठी 12 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. या विकास कामांचे भूमिपूजन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
भूमिपूजन झालेल्या वरील विविध गावांत मातोश्री पाणंद रस्ते, लेखाशीर्ष 2515, 3054, एफडीआर 3054 – 2419 आदी योजनेतून रस्ते विकासासह विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहे. भूमिपूजन करण्यात आलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावी. करण्यात येणारी विकास कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, दारासिंग चव्हाण, बाबू चव्हाण, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, उस्मान पठाण यांच्यासह तहसीलदार रमेश जसवंत, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दीपक मोगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन राठोड, तालुका कृषी अधिकारी श्री वाघ, सिंचन विभागाचे शाखा अभियंता गजानन जोशी आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकऱ्यांची उपस्थिती होती.