Big Political News : ” शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती होताच…..” पहा सविस्तर बातमी.
शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा फटका बसला. चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतून ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन वेगळे गट झाले. ज्या पद्धतीने शिवसेनेतून आउटगोइंग सुरू झाल. त्याच पद्धतीने इन्कमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शिवसेना मजबूत राहावे, शिवसेना भक्कम राहावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जोरदार दौरे काढले. आणि जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्या सोबत जोडून ठेवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. यात अनेकजण शिवसेनेतच सहभागी होत आहेत. तसेच अनेक संघटना अनेक विविध विचारांची लोक देखील शिवसेनेसोबत काम करत आहेत.
त्यामुळे आताची बातमी ही सर्वात मोठी आहे, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र काम करणार अशी घोषणा झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे प्रमुख प्रवक्ते गंगाधर बनबरे हे देखील उपस्थित होते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यासोबत आणि एकत्र युती ने आता काम करणार आहेत . संभाजी ब्रिगेड सुरुवातीच्या काळात सामाजिक काम करत होती , त्यानंतर राजकीय क्षेत्रात उतरून संभाजी ब्रिगेड यांनी देखील निवडणुकीचे मैदाने गाजवले आहेत.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र काम करत असल्याची घोषणा करण्यात आली, तसेच यावेळी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र मिळावे देखील घेणार आहेत असेही सांगण्यात आलं. तर पुढे लढवय्या सहकाऱ्यांचा मी स्वागत करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले ”केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचा कारस्थान सध्या सुरू आहे,कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील किंवा बेबंदशाही राहील याचा निर्णय असेल. आपल्या विचारांची लोक आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचण्यासाठी एकत्र यायला हवं मला अनेक जण म्हणतात की संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवु असे ही ठाकरे म्हणाले.
आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत, आम्ही सत्तेत होतो ,आता पुढे येणारच आहोत . काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात ही आपली वैचारिक युती आहे. महाराष्ट्रात जे काही घडेल की बिघडेल ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत असा टोला लगावला, माझं हिंदुत्व पटल म्हणून संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. संभाजी ब्रिगेडचा मतभिन्नता किती आहे यापेक्षा एक मते किती आहे ते महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले समन्वय राखून आम्ही काम करू असं त्यांनी आवर्जून सांगितलं. लवकरच आपण एक महामेळावा घेणार आहोत. आज मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे एक मताने म्हणाले आज एका क्रांतीची गरज आहे म्हणूनच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आलेली आहे. सध्या लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असे यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले त्यामुळे ते काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड काम करणार आहे . आता हे कशा पद्धतीने काम करणार आहे याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष आहे .