महत्वाची बातमी
Breaking News : शेतातून घरी परतत असतांना महिलेचा वीज पडून मृत्यू. पहा सविस्तर.
वैजापूर तालुक्यातील मौजे चांदेगाव येथील घटना.
विजय चौधरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
सध्या पावसाचे दिवस आहेत आणि त्यातच काही घटना घडत आहेत. आज वैजापूर तालुक्यातील मौजे चांदेगाव येथे सायंकाळी झालेल्या विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू होता याच दरम्यान दीपाली राहुल बोधक वय ३१ वर्षीय महिलेचा घराकडे जात असताना गट नंबर ३८ मध्ये वीज पडून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदरील महिलेचे प्रेत वैजापूर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.