नगर पुणे महामार्गावर अपघात, पुण्याहून अमरावती कडे जाताना एकाच घरातील तब्बल “एवढे” सदस्य जखमी.
आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग आपल्या हाती आली आहे ती म्हणजे बर्याच दिवसापासून आपण नगर पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आपण सगळे ऐकून आहोत त्यातच आज पुन्हा एकदा एक भीषण अपघात झालाय. नगर पुणे महामार्ग अपघाताचं क्षेत्र बनत आहे दिवसेंदिवस या ठिकाणी अपघात होत आहेत. हे अपघात इतके भयानक असतात की यामध्ये जागीच अनेक जणांचा जीव जातो.
कामरगाव शिवारात एक भीषण अपघात झालाय, स्माईल स्टोन हॉटेल जवळ भरधाव वेगाने येणारी कार पुलावरील एक कठडा तोडून थेट खाली कोसळली. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावरती नगर मधील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. ते अमरावती येथील राहणारे नोकरी निमित्त पुणे या ठिकाणी राहत होते.
पोकळे कुटुंबीय पुण्याहून अमरावतीकडे जात होते आणि याच दरम्यान या कामरगाव शिवारात हॉटेल जवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळेच त्यांचा हा अपघात झाला कार अतिशय जोरदार धडकली आणि थेट कठडा तोडून खाली कोसळली. वीस ते पंचवीस फूट खाली कोसळल्यामुळे हा मोठा भीषण अपघात झाला. सदर अपघात इतका भीषण होता की कारची अशी अवस्था पाहून यातून सर्वजण वाचले आहेत.
मात्र यातील दोघांना गंभीर स्वरूपाची इजा झाली असून त्यांना उपचार सुरू आहेत. सुदैवानं यातले सर्व जण सुखरूप आहेत. अन्यथा मोठी जीवित हानी देखील होऊ शकली असती.