ब्रेकिंग : अहमदनगर तोफखाना मधील पोलीसाला रंगेहात पकडले.
अत्यंत महत्त्वाची बातमी अहमदनगर शहरांमध्ये तोफखाना पोलीस स्टेशन मधील एक पोलीस एसीबीच्या जाळ्यात.
वेगवेगळ्या सरकारी, निम सरकारी कार्यालयामध्ये लाच देणे घेणे याबाबतच्या बातम्या तुम्ही ऐकल्या किंवा पाहिले असतीलच, पण आज या बातमीमध्ये चक्क अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन येथील एका पोलिसाने विनापरवाना दारू विक्री करण्यासाठी परवानगी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात एका खाजगी व्यक्तीच्या मार्फत ३०००० रुपये लाच घेत असताना त्या पोलिसाला एसीबीने रंगेहात पकडले.
या पोलिसांनी या कामासाठी ३०००० रुपये लाचेची मागणी केली, ठरल्याप्रमाणे ३०००० रुपये लाच खाजगी व्यक्ती वैभव साळुंखे ( वय 35 वर्ष रा. अ.नगर ) याच्या मार्फत ३०००० रुपये रक्कम लाच स्वीकारली या लाचेची मागणी 21 जुलै २०२२ ला झाली होती आणि ही लाज आज 2 ऑगस्ट 2022 रोजी स्वीकारली गेली.
तोफखाना येथील या पोलिसाने ३०००० रुपये रकमेची लाच आरोपी खाजगी इसम वैभव यांनी स्वतः गोमसाळे यांच्या वतीने सिटी स्टोअर, पाईपलाईन रोड, एकविरा चौक, अहमदनगर या ठिकाणी स्वीकारली आहे यावरुन पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
तपास अधिकारी :
श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
सापळा पथक :
पोहवा. सचिन गोसावी पोहवा. प्रफुल माळी पोहवा. चंद्रशेखर मोरे पोना. शरद हेंबाडे पोहवा. संतोष गांगुर्डे.