ब्रेकिंग : पाहा ” या ” कॉफी शॉपमध्ये नको तसल्या कामासाठी घेतले जातात ” तब्बल ” एवढे पैसे.

गेवराईत नेमकं चाललय तरी काय ? या ठिकाणी कॅफेच्या नावाखाली अत्यंत भयावह असं काहीतरी घडतंय. महाविद्यालयीन तरुण-तरुणी हे कॅफेमध्ये जाऊन तासनतास बसत असतात. बसण्यासाठीच चांगलं ठिकाण म्हणून कॅफेची ओळख असते. मात्र जर हाच कॅफे अत्याचाराचा अड्डा बनत असेल तर ?
हो गेवराई मधील एका अल्पवयीन मुलीवर बीड मधील कॉफी शॉप मध्ये आणून अत्याचार केल्याचा संताप जनक प्रकार घडला आहे. सध्या ती साडे आठ महिन्याची गर्भवती आहे. विशेष म्हणजे कॉफी शॉप मधल्या 3 x 4 च्या केबिनच्या एका तासभरासाठी 300 रुपये दर आकारल्याचे समोर आले. १६ वर्षीय ही मुलगी अंबड तालुक्यातील रहिवाशी आहे.
गेवराई येथे चुलत भावासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेली होती तेवढ्यात चुलतीच्या मोबाईलवर रिचार्ज टाकण्यासाठी गेली असता, रोहित अभिमान आठवले आणि सय्यद फरान अली या दोघांनी तोंडाला रुमाल बांधून तिला बीडला आणलं. येथील एका कॉफी शॉप मध्ये ३०० रुपये दराने तासभरासाठी 3 x 4 आकाराची केबिन घेतली. याच ठिकाणी तिच्यावरती रोहित ने ३ वेळा अत्याचार केले. ही बाब मुलगी गर्भवती राहिल्याने समोर आली.
या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत. गेवराई पोलिसांनी बीड मधील कॉफी शॉप आणि घटनास्थळाचा पंचनामा करून काही पुरावे देखील जप्त केले आहेत. तर महिला आयोगाचा या पिडितेला आधार मिळालेला आहे. महिला आयोगाच्या सदस्या यांना हा प्रकार समजताच त्यांनी या पिडीतेला भेट दिली आणि सकारात्मक चर्चा केली.
तसेच कॉफी शॉप ला भेट देऊन सर्व आरोपांवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी विशेष पथक तयार करावं, सर्व कॉफी शॉप ची तपासणी करावी असेही यावेळी त्या म्हणाल्या. या प्रकरणाचा लवकर तपास लावावा. कॉफी शॉप चालकासह सह आरोपी असणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली.