ऑनलाईन आयपीएल वर सट्टा-जुगार खेळणाऱ्यांवर देसाईगंज पोलीसांची मोठी कारवाई.
जिल्हा प्रतिनिधी:-भुवन भोंदे
देसाईगंज:- यापूर्वी मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर दिनांक १०/५/२०२३ रोजी पोस्टे देसाईगंज येथे मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारावर कुथे पाटील हायस्कुल देसाईगंज समोर जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी काही ईसम चेन्नई विरुध्द दिल्ली या आयपीएल क्रिकेट सामन्यावरती अवैध वेबसाईटच्या माध्यमातून सट्टा ( जुगार /बेटींग ) खेळत असल्याचे मिळून आले.
तेंव्हा त्यातील एकास ताब्यात घेऊन विचारपूस करुन मोक्यावर झडती घेतली असता त्याने सांगितले की, सदर वेबसाईटची लिंक, युजर आयडी आणि पासवर्ड इत्यादी अक्षय रमेश मेश्राम रा. गांधी वार्ड देसाईगंज या व्यक्तीने दिली असुन त्या वेबसाईटच्या माध्यमातून मी अवैध सट्टा लावत असल्याचे सांगितले. तसेच अक्षय मेश्राम हा शहरातील अनेक तरुणांना आयपीएलवर सट्टा (जुगार /बेटींग ) लावण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड तयार करुन देऊन सट्टाबाजी करण्यास उत्तेजित करीत असल्याचे सांगितले.
आम्ही पोलीस स्टॉफसह शहरात त्याची शोध घेऊन पाठलाग केले असता लांखादूर टि पाईंट जवळ रोडच्या बाजूला एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची हयुडाई क्रेटा वाहन क्र. एमएच ४० एआर ९३६३ अंदाजे किंमत ६,५०,०००/- रुपयाच्या वाहनामध्ये आत बसुन अवैधरित्या आयपीएलवर सट्टाबाजी करीत असताना आढळून आला. त्याचवेळी त्याची व वाहनाची झडती घेतली असता जुन्या वापरत्या अॅपल, सॅमसंग, रेडमी कंपनीचे मोबाईल फोन, विविध बँकेचे एटीएम कार्ड, काही पर्सनल कागदपत्र, आकडेवारीचे चिट्टी व काही रोख रक्कम असे मिळून अंदाजे एकुण ७,११,६२० /- रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केलेला आहे.