दिवाळी स्पेशल Viral : फटक्याची वात पेटवून पळताना ” हा ” भाजपा आमदार तोंडावरच पडला, एकदा व्हिडिओ पहाच.
येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी सण साजरा केला जाईल. संपूर्ण देशामध्ये दिवाळी हा सण साजरा केला जाईल. दिवाळी हा सण सुख समृद्धी व उत्साहाचे प्रतीक मानले जाते. या दिवाळीमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असते लहान मुलांना तर हा सण खूपच आवडतो. आणि याचं कारण म्हणजे दिवाळीमध्ये त्यांना भरपूर प्रमाणात फटाके फोडायला मिळतात त्याचप्रमाणे त्यांना नवीन कपडे शाळेला सुट्टी सुद्धा मिळालेली असते. आणि म्हणूनच दिवाळी सणाची ही लहान मुले वाट पाहत असतात. फटाके व दिवाळी यांचं वेगळच समीकरण आहे. थोडक्यात जर दिवाळीला फटाके वाजवले नाही तर दिवाळी साजरी केली की नाही असा प्रश्न निर्माण होतो. दिवाळी सणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी लोक पहाटे लवकर उठून अभंग स्नान करतात. आणि त्यानंतर मैदानामध्ये फटाके फोडायला जातात.
दिवाळी सणामध्ये सर्वच लोक फटाके फोडण्यासाठी खूपच उत्साही असतात. तर फटाके फोडण्यासाठी काही लोक खूप घाबरतात फटाक्यामुळे आपल्या शरीराला एखादी इजा होऊ नये अशी भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि अशी फटाके फोडण्यासाठी घाबरणारे लोक जेव्हा फटाके पेटवत असतात तेव्हा अनेकदा बरेचसे मजेदार किस्से घडलेले आपण देखील पाहिले असेल. असाच एक प्रसंग चक्क एका भाजपाच्या आमदाराबरोबर घडला आहे त्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊ.
दिवाळी सणामध्ये फटाके फोडणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि यामध्ये खरी मज्जा ही फटाके फोडायला घाबरणाऱ्या लोकांची येते. असाच एक प्रसंग बिहारमधील भाजपाचे आमदार यांच्या सोबत घडला आहे. सोनपूर मधील भाजपाचे आमदार विनायक कुमार सिंह एका कार्यक्रमाला गेले असताना या कार्यक्रमाच्या वेळी फटाक्याची वात पेटवायला जातात. आणि त्याच वेळेस तिथे एक किस्सा करतो तेव्हा पेटवत असताना घाबरून जोरात पळायला लागतात. आणि या घाई गडबडीमध्ये त्यांचा अचानक तोल निसटतो आणि ते तोंडावर खाली पडतात. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.
याबद्दल मिळालेली माहिती अशी की, भाजपाचे आमदार एका फुटबॉलच्या मॅचचे उद्घाटन करण्यासाठी एका कार्यक्रमाला गेले होते. सदरील ही घटना याच दरम्यान घडली आहे. ही घटना 3 ऑक्टोबर ची आहे. भाजपा आमदार फटका पेटवत असताना यावेळी मैदानामध्ये जे लोक हजर होते यांनी तो व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल झाला. यामध्ये आपण पाहू शकतो की, भाजपा आमदाराने फटाक्याची वाट पेटवतात तिथून पाळण्याचा पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि याच वेळेस त्यांचा तोल जाऊन ते तोंडावर खाली पडतात. यानंतर शेजारी असणारे लोक त्यांना उचलतात आणि त्याच वेळेस लगेच फटाका फुटतो. तो फुटल्यानंतर आजूबाजूला धूर पसरतो सध्या या आमदाराचा व्हिडिओ नेटकरी सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडिओचा आनंद देखील घेत आहेत.