DJ आणि लेझर Lights कोल्हापूरकरांना ठरले घातक, लेझर शोमुळे डोळ्यांची पहा काय झाली ही अवस्था.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सणासुदींवरती मोठे निर्बंध होते. यावर्षी सर्व निर्बंध हटवलेले आहेत. यंदाच्या वर्षी त्यामुळे धूमधडाक्यामध्ये सण उत्सव साजरे केले जात आहेत. पूर्वी कोल्हापुरात डॉल्बी वरती बंदी होती, मात्र यंदाच्या वर्षी डॉल्बीची बंदी हटवल्याने सर्वत्र डॉल्बी जोरात वाजताना पाहायला मिळाला.
कोल्हापूर मध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी सोबत पोलीस देखील जोरदार थिरकले, मात्र हाच DJ आणि रोषणाई कोल्हापूरकरांना घातक ठरली, कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीत लेझर शोमुळे तब्बल 63 जणांच्या डोळ्याला इजा झाली, त्याचबरोबर रुग्णांमध्ये ही संख्या वाढण्याची देखील शक्यता असल्याचं कोल्हापूरच्या नेत्र संघटनेने ही माहिती दिली आहे. डॉल्बी सोबत यांना लेझर किरण हि मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहेत.
हाच लेझर चिंतेचा विषय ठरला असून डोळ्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे, सोबतच मोबाईल वर ही परिणाम झाले असून अनेक मोबाईलचे कॅमेरे देखील बाद झाले आहेत. मिरवणुकीत वापरण्यात आलेले हे लेझर अत्यंत धोकादायक ठरले आहे तर मिरवणूक आकर्षक बनवण्यासाठी अति तीव्र लेझर किरनांचा वापर केला जात असल्याने प्रचंड क्षमतेने उष्णता बाहेर पडते आणि माणसासाठी ती धोकादायक ठरते.
लेझरच्या वापरात थोडी जरी चूक झाली तरी त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांना याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ६३जण सध्या या लेझरच्या त्रासाने चिंतेत आहेत यात वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे .