हालाखीच्या परिस्थिती रेहान मारली बाजी; त्याने या परीक्षेत यश मिळवले, गावातून कौतुकाचा वर्षाव.

चिकाटी, जिद्द, चित्त, मग्न हेच यशाचे गमक रेहान खेतेवाले यांचे प्रतिपादन.

वाशीम जिल्हातील कारंजा येथील रेहान रमजू खेतीवाले याने नीट २०२२ च्या परीक्षेत चिकाटी, जिद्दी, चित्त, मग्न लावून अभ्यास करून झालेल्या परीक्षेत ७२० पैकी ६४२ गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. त्याच्या यशाचे खरे कारण चिकाटी, जिद्द, चित्त व मग्न होऊन एकाग्रतेने अभ्यास केल्यामुळे हेच यशाचे गमक असल्याचे प्रतिपादन रेहान खेतीवाले यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या काळात ऑनलाइन अभ्यास करीत स्वतःला इतर गोष्टीपासून दूर ठेवत मन लावून अभ्यास केला. कोणतेही क्लासेस न लावता नीट परीक्षेत भरभरून यश संपादन केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रेहान खेतीवाले यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांचे वडील एलआयसी कंपनीमध्ये एजंट म्हणून काम करून घराचा उदरनिर्वाह करतात. अशा बिकट परिस्थितीत त्याने नीट मध्ये यश संपादन केल्याने त्याचे कौतुक होत आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना देत आहे.