नाचता नाचता नवरीच्या अंगावर पडला DJ, लग्नातील धक्कादायक Video इंटरनेटवर व्हायरल.
लग्न DJ याचं एक वेगळ समीकरण आहे, वरात आणि त्यात नाचगान हे सर्वाना पाहिजे असत. मोठे मोठे SOUND लावले जातात. मजा मस्ती केली जाते.लग्न म्हटलं की मजा, मस्ती, डान्स, धम्माल या गोष्टी तर आल्याच. पण अनेकदा लग्नात अशा काही गोष्टी घडतात की ज्या पाहून खरंच थक्क व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लग्नात डान्स करत असताना नवरा-नवरीच्या अंगावर चक्क DJ चा स्पीकर पडला. या प्रकारामुळे मांडवात एकच गोंधळ माजला. DJ च्या तालावर नाचणारी मंडळी या अपघातामुळे अचानक शांत झाली. चला तर मग पाहूया स्पीकर अंगावर पडल्यानंतर मांडवात पुढे काय घडलं?
तर त्याचं झालं असं की नवरदेव नवरीसोबत डान्स करत आहे. मांडवात DJ लावला असून पाहुणे मंडळी देखील डान्स करण्यात मग्न आहेत.
तेवढ्यात डान्स करता करता अचानक DJ चा स्पीकर नवरा-नवरीच्या अंगावर पडतो. नाचता नाचता नवरा-नवरी थोडेसे मागे येतात तेवढ्यात स्पीकर दोघांच्या अंगावर पडतो. अनपेक्षितरित्या अंगावर पडलेल्या DJ मुळे कपल खाली कोसळतं. पण तेवढ्यात पाहुणे मंडळी धावत येऊन त्यांच्या अंगावरून स्पीकर बाजूला करतात. सुदैवानं या अपघातात कोणाला फारशी इजा झालेली नाही.
या व्हिडिओला जवळपास ६ हजार लोकांनी लाईक केलं आहे. लग्नसोहळ्याचा हा व्हिडिओ खरंच धक्कादायक आहे. मात्र, अनेकांना तो गंमतीशीरही वाटत आहे. लोक हसण्याच्या इमोजीने प्रतिक्रिया उमटत आहेत.