महिन्याला कमवा हजारो रुपये ते ही घरच्या घरी; त्यासाठी ‘ हे ‘ करा. पाहा बातमी सविस्तर…
तुम्हाला जर कोणी घरबसल्या पैसे देणार असेल तर ? यावर विश्वास बसत नाही ना ? पण पोस्टात जर तुम्ही या पद्धतीने गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता, भारतीय आणि पोस्ट ऑफिस यांच्यातील नाते हे विश्वासाचे आहे. जर तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस मन्थली इन्कम स्कीम हा एक चांगला पर्याय आहे, अशी माहिती डाकघर विभागामार्फत दिली जाते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत सध्या ६.६० टक्के व्याज दिले जात आहे. जे अन्य एफडी किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा खूप चांगले आहे. या मासिक योजनेमध्ये दरमहा व्याज जमा होते. हे व्याजाचे पैसे कमाई म्हणून वापरले जाऊ शकतात. व्याजाचे पैसे तुमच्या बचत खात्यात दर महिन्याला इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमद्वारे जमा होत राहतील. या योजनेत तुम्हाला नाहक कुठलाही त्रास होणार नाही.
कारण या योजनेत व्याजाच्या रकमेवर कोणताही टीडीएस कापला जात नाही. व्याजाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम करांच्या अधीन आहे. या योजनेत एका व्यक्तीला एक हजाराच्या पटीत जास्तीत-जास्त साडेचार लाख रुपये भरता येतात. पती-पत्नी जॉईन खाते असल्यास मात्र ९ लाखापर्यंत रक्कम योजनेद्वारे पोस्टात ठेवू शकता. एकंदरीत या गुंतवणूक योजनेचा तुम्ही कशा पद्धतीने फायदा घेणार आहात हे पाहू.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही साडेचार लाख गुंतवणूक केली, तर ही गुंतवणूक योजना उघडताना व्याजाचा दर ६.६० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. जर या आधारावर व्याज मोजले गेले, तर तुम्हाला दरमहा २४७५ रुपये कमावताल. अशा प्रकारे जर ही योजना पाच वर्षे चालली तर तुम्हाला १,४८,००० रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजेच साडेचार लाख रुपये एकरकमी जमा करून तुम्ही दरमहा २४७५ रुपये आरामात कमावू शकता.
ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे या योजनेचा कालावधी हा पाच वर्षाचा असणार आहे. जर त्या आधी तुम्ही पैसे काढले, तर नुकसान होण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढू शकत नाही. तर दुसऱ्या वर्षी गुंतवलेले पैसे काढायचे असल्यास २ टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते. ३ ते ५ वर्षे अवधीत काढल्यास १ टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाते. मग जर तुम्हाला ही योजना आवडली असेल फायदेशीर वाटत असेल तर आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा आणि या योजनेचा लाभ देखील घ्या.