लग्नाचे आमिष दाखवून 2019 पासून विवाहितेवर अत्याचार, शिंदे गटाच्या समर्थकावर गुन्हा दाखल.
आत्ताच एक बातमी हाती येत आहे शिंदे गटाचा समर्थक तसेच पूर्वाश्रमीचा युवा सेनेचा पदाधिकारी ज्योतीराम धोंगडे पाटील यांनी एका विवाहितेला लग्नाचा आम्हीच दाखवून अत्याचार केले आहेत. त्याचप्रमाणे या पिढीतेकडून तब्बल दोन कोटी रुपये उकळून ती गर्भवती राहताच गर्भपात करून त्याचप्रमाणे बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, ज्योतीराम पाण्याच्या टँकरचा व्यवसाय करतो त्याची पिडीतेसोबत यामधूनच ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले व दोघांमध्ये भेटीचे प्रमाण वाढत गेले. सदरील पीडीता ही कौटुंबिक कलहामध्ये असल्याने या ज्योतिरामने त्याचाच गैरफायदा घेतला. 2019 पासून हा ज्योतीराम तिला लग्नाचे आम्हीच दाखवून विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये नेत, तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच या दोघांमधील काही खाजगी क्षणाची व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याचप्रमाणे त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग च्या आधारे ब्लॅकमेल करून सदरील पीडीतेकडून त्याने सातत्याने पैसे देखील उघडले आहेत.
यादरम्यान पिढीचा गर्भवती राहिली. ज्योतीराम कडून या पिडीतेला एक मुलगी असल्याचा दावा तिने तक्रारीमध्ये केला आहे. त्याचप्रमाणे पीडीतेने पहिल्या पतीपासून रीतसर घटस्फोट घेतला. नंतर गर्भवती राहिल्याने ज्योतीराम ने पहिला तिचा गोळी देऊन गर्भपात केला. २ मार्च रोजी गर्भवती असताना त्यानी मारहाण केल्याने त्यात दुसऱ्यांदा गर्भपात झाला. ” मी राजकारणामध्ये असून तुझ्याशी लग्न करू शकत नाही.” असं सांगून त्याने लग्नासाठी थेट नकारच दिला. पिडीतेने त्याला कॅनॉट परिसरामध्ये भेटण्याचा प्रयत्न केला असता, ज्या ज्योतिरामने थेट बंदूक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आणि यामुळे या पिढीतेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. व त्यानंतर पोलिसांनी याच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे.
यामध्ये पिढीचा म्हणते की, या ज्योतिरामने माझ्याकडून आधी ३ लाख रुपये घेतले, नंतर महागडे मोबाईल व 35 लाख रुपयांचे दागिने घेतले. दोन महागड्या गाड्या घेऊन या पिडीतेला ते हप्ते भरण्यासाठी सांगितले, तसेच क्रेडिट कार्डचे हप्ते देखील या पिडीतेलाच भरण्यात सांगितले. तो वारंवार या पिडीतेला ब्लॅकमेल करून जवळपास २ कोटी रुपये घेतल्याचा आरोप या पिडीतेने तक्रारीमध्ये केला आहे.
आरोपी ज्योतीराम हा पूर्वी युवा सेनेचा शहर प्रमुख होता, नुकत्याच झालेल्या गणपती महोत्सवात अनेक बडे पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचा वावर देखील पाहायला मिळाला. सेनेमध्ये फुट पडल्यानंतर मोठ्या नेत्यांसह त्याने शिंदे गटात प्रवेश केला. क्रांती चौकामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सत्कारात तो अग्रभागी होता. स्वतःचा युवा मंच असल्याने ज्योतीराम सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात राहायचा. पण या ज्योतिरामवर गुन्हा दाखल झाल्यानंतर युवा सेना व शिवसेना यामध्ये खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत.