भांड्याच्या दुकानात चालू होती राजकीय चर्चा; एकाने डोके फोडले तर दुसऱ्याने पहा पहिल्यासोबत काय केले.

आपण बऱ्याचदा कट्ट्यावर राजकीय चर्चा करत असतो, त्यातही आपले मित्र हे कधी कधी विरुध्द पक्षाचे असतात तर त्यावरून काही प्रमाणात शाब्दिक वाद होतो पण एका भांड्याच्या दुकानामध्ये राजकीय चर्चेचा विषय अतिशय टोकाला गेला आणि भलतेच प्रकरण त्याठिकाणी घडते, चला तर त्याबद्दल जाणून घेऊ नेमके प्रकरण काय आहे. चहा पिताना, व्हाट्सअप असेल ग्रुप असेल फेसबुक असेल या सर्व ठिकाणी चालू घडामोडींवरती अनेक चर्चा होतात.
मात्र ही बातमी तुम्हाला चक्राहून सोडणारी आहे. एका भांडे विक्रीच्या दुकानांमध्ये देखील अशीच राजकीय चर्चा सुरू होती. सध्या राजकारणात काय घडते, कोणाचे बरोबर, कोणाचं चुकीचं यावरून होणारे विश्लेषण, याबद्दलचे अभिप्राय समीक्षण या पद्धतीच्या दोन कामगारांमध्ये चर्चा सुरू होत्या. कल्याण मधील एका भांडे विक्रीच्या दुकानांमध्ये हा प्रकार घडला. या घटनेत धीरज पांडे हा तरुण जखमी झाला आहे.
धीरज पांडेवर हल्ला करणाऱ्याचे नाव मनीष गुप्ता आहे. राज्यातील आणि देशातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरती ठिकठिकाणी अनेक चर्चा सुरू असतात, त्याबद्दल तर्क वितर्क लावले जातात काही मुद्दे यावरती ही चर्चा केली जाते. असंच काहीशी चर्चा मनीष आणि धीरज यांच्यामध्ये सुरू होती. विषय होता देशावरती किती कर्ज आहे ? बजेट काय मांडलं नेमकी काय स्थिती आहे ? यावरती चर्चा सुरू असताना धीरज हा काही जणांसोबत तिथे चर्चा करत होता.
या चर्चेत कामगार मनीष हा देखील सहभागी झाला होता. धीरज ने जो मुद्दा चर्चेचा दरम्यान उपस्थित केला, तो मनीष ला पटला नाही. मनीषने थेट कुकर चे झाकण उचललं आणि धीरजच्या डोक्यात मारला. यात धीरज जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. बाजारपेठ पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मनीषाला ताब्यात घेतलं असून जखमी तरुणान पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. यासाठी शिवसेनेचा महिला पदाधिकारी पुढे सरसावल्या या घटनेचा आता पोलीस देखील तपास करत आहेत.