” माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, नाहीतर तुझा….” अशी दिली धमकी. पहा बातमी सविस्तर
जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चोपडा शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती महाविदयालयात जात असतांना सागर पाटील या तरुणाने मुलगी अल्पवयीन असतानाही प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले.
”माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव आणि लग्न कर नाहीतर अन्यथा महिनाभरापूर्वी जसा एका मुलीचा खून झाला होता तसा तुझा खून करेन, अशी धमकी एका तरुणाने अल्पवयीन मुलीला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.
चोपडा शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती महाविदयालयात जात असतांना सागर पाटील या तरुणाने मुलगी अल्पवयीन असतानाही प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. तसेच सागर पाटील हा वेळोवेळी तिचा पाठलाग करायचा तसेच पिडीत मुलीच्या मोबाईल क्रमांकवर वेळोवेळी संपर्क साधायचा. पिडीत मुलीची ईच्छा नसतांना देखील सागर याने बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. परंतू त्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सागर याने पिडीतेस महाविद्यालयात प्रत्यक्ष भेटून तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही. तर एक ते दिड महिन्यापूर्वी एका मुलीचा जसा खून झाला होता तसा तुझा खून करेन. तसंच तूझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली.
इतकंच नव्हे तर तरुणीने तुझा मर्डर करुन तुझी बदनामी करुन टाकेन अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर माझ्यावर प्रेम करावे व लग्न देखील करावे लागेल, असे बोलून पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे गैरकृत्य करुन मुलीला चापटांनी मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने मंगळवारी चोपडा शहर पोलिसात सागर पाटील याच्याविरोधात तक्रार दिली.