यवतमाळ मध्ये पाऊसाचा हाहाकार ! महापुरात अडकलेल्या दोन तरुणांनी पाहा काय केलं.
महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडतो तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस आहे. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या नाले यांना पूर आले आहे. तर काही ठिकाणी धरणही भरून वाहू लागली. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. इतकच नव्हे तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागलेत. काही ठिकाणी या परिस्थितीमुळे अपघातही झाले आहेत.
पावसाळ्यात पाण्याचे पुराचे नदी नाल्यांचे आणि अनेक लोकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र काही व्हिडिओ तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी असतात. असाच एक व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यातील आहे. यवतमाळ जिल्हा अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्या यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा प्रकल्पाच्या विसर्गामुळे बेंबळा नदीला मोठ्या प्रमाणात पुर आला आहे. आणि याचाच परिणाम म्हणून अचानक गाव शेतांमध्ये पाणी सुरू लागला.
यवतमाळ जिल्ह्यातील मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पातळ्या वाढल्या, त्यात शेतात काम करण्यासाठी दोघेजण गेलेले अडकून पडले आहेत. अचानक बेंबळा नदीची पाणी पातळीत वाढ झाली. त्या दोघांनीही जीव वाचवण्यासाठी एक युक्ती केली. झाडाचा सहारा घेत ते झाडावरती चढले ही बाब काही लोकांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला. आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा व्यवस्थापन पथक त्या ठिकाणी दाखल झालं. त्यांनी बचाव कार्य सुरू केलं दरम्यान या दोघाजणांचा अडकलेला व्हिडिओ सदा सोशल मीडिया वरून समोर येतोय. हा व्हिडिओ पाहून धक्काच बसतो कारण की, आपला जीव वाचवण्यासाठी माणूस कशा पद्धतीने एखादा झाडाचा सहारा घेतोय मात्र पावसाळ्यात झाडांचा सहारा घेणे हे सुद्धा तितकंच धोक्याचं ठरू शकतात.