त्याने घरातल्या सर्व महागड्या वस्तू फोडल्या; कारण ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही, पहा बातमी सविस्तर.
आज कालचे मुलं हे जास्त प्रमाणामध्ये डिजिटल गोष्टींकडे आकर्षित होतात, अगदी लहानपणापासून जर लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला, तर त्यांना त्या मोबाईलची सवय लागून जाते. आपण कित्येक वेळेस पाहिले असेल की, बऱ्याच लहान मुलांना चष्मा देखील लागलेला आहे. त्याचप्रमाणे बरेचसे मुलं आपण मोबाईल बाबतीत अॅडीक्टेड झालेले सुद्धा पाहिले आहे. कधी कधी तर लहान मुलांना जेवण भरवत असताना सुद्धा मोबाईल लागतो.
तर काही मुलांना त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा असेल तरीसुद्धा ” थोड्या वेळा मोबाईल खेळ आणि नंतर अभ्यास कर.” असं बऱ्याचदा आईकडून सांगितलं जातं. थोडक्यात आजची मुलं ही मोबाईलसाठी लवकर आकर्षित होतात. प्रत्येक क्षणाला त्यांना मोबाईल हीच गरज आहे असं भासु लागतं. त्या मोबाईल मध्ये असणारे गाणे, गेम यासाठी ही लहान मुले अॅडीक्टेड होतात.
अशीच एक घटना एका ठिकाणी घडली आहे. एक मुलगा मोबाईलवर गेम खेळत असतो आणि त्याची आई येऊन त्याच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेते आणि त्याला जोराने ओरडते. आणि याच गोष्टीचा त्याला राग येतो. आणि मग तो राग आल्यामुळे घरातील प्रत्येक वस्तूची तोडफोड करायला सुरुवात करतो. अगदी घरातल्या लहानशा लहान वस्तूची सुद्धा तो तोडफोड करताना सदरील व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
हा व्हिडिओ भारतातील नसून बाहेरील देशातला आहे पण हा व्हिडिओ पाहिला असता आपल्याला एका मोबाईल साठी या मुलाने घरातली किती नुकसान केले आहे याचा अंदाज येऊन जाईल. त्यामुळे जर आपल्याही घरामधील लहान मुलं मोबाईलच्या बाबतीत जास्त आकर्षित होत असतील, तर त्यांना आत्ताच आळा घालणं गरजेचं आहे. जास्त लागलेली मोबाईलची सवय ही त्यांच्या मेंदूवर, डोळ्यावर परिणाम करू शकते.
आजही लहान मुलांना मोबाईलची सवय लागू नये म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये सोशल मीडियावर, जनहितार्थ बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि दाखवल्या जातात. म्हणूनच आपण एक पालक असाल तर आपल्या पाल्याला या मोबाईल पासून होईल तेवढे लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी पसंती देखील दाखवली असून, वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स देखील त्या व्हिडिओवर येत आहेत.