” तो ” सांता क्लॉज बनून गिफ्ट वाटत होता; लोकांनी बेदम मारले व कपडे पण फाडले, कारण ऐकून तुम्हाला पण राग येईल.

गुजरात मध्ये ख्रिसमस सणाला गालबोट लागलं आहे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या सांता क्लॉज वर काही लोकांनी हल्ला केला आहे. सांता क्लॉजच्या वेशात शशीकांत डाभी नावाची व्यक्ती मकरपुरा परिसरातील अवधूत सोसायटीत एका ख्रिश्चन कुटुंबाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली. त्यांच्यासोबत ख्रिश्चन समाजाचे काही नेते देखील होते. ते त्यांच्या घरात शांततेत ख्रिसमस साजरा करत होते. यावेळी काही जणांचा एक गट अचानक ख्रिश्चन कुटुंबात घुसले. त्यांनी कार्यक्रम रोखला आणि सांता क्लॉजवर हल्ला केला.
सांता क्लॉजच्या वेशातील व्यक्ती मकरपुरा परिसरातील अवधूत सोसायटीत एका ख्रिश्चन कुटुंबाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली. त्यांच्यासोबत ख्रिश्चन समाजाचे काही नेतेदेखील होते. ते त्यांच्या घरात शांततेत ख्रिसमस साजरा करत होते. यावेळी काही जणांचा एक गट अचानक ख्रिश्चन कुटुंबात घुसले. त्यांनी कार्यक्रम रोखला आणि सांता क्लॉजवर हल्ला केला.
जमावानं त्यांना पोशाख काढायला लावला. उत्सवात सहभागी झालेल्यांना धमकावलं. हा परिसर हिंदूंचा आहे. इथे अशा प्रकारचा उत्सव साजरा करू देणार नाही, असं म्हणत जमावानं सांता क्लॉजवर हल्ला केला. जमावानं केलेल्या मारहाणीत एक महिलेसह चार जण जखमी झाले. हल्लेखोरांनी फादरचे कपडे फाडल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात बडोद्यातील मकरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक व्यक्ती सांता क्लॉजचा पोशाख परिधान करून वसाहतीत चॉकलेट वाटत होता. तो लोकांना भेटत होता, त्यांना शुभेच्छा देत होता, असं गुजरात पोलिसांनी सांगितलं.काही जणांनी सांता क्लॉजच्या पोशाखात चॉकलेट वाटण्याबद्दल आक्षेप घेतला. यामुळे दोन समुदायांमध्ये वाद झाल्याचं पोलीस निरीक्षक रश्मीन सोलंकी यांनी सांगितलं. घटनेनंतर ख्रिश्चन समाजाचे लोक आमच्याकडे आले. त्यांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे, असं पोलीस म्हणाले.