हृदयद्रावक : ३ वर्षाच्या चिमुकलीने दरवाज्यात बोट ठेवले आणि अखेर नको तेच घडले; पहा बातमी सविस्तर.
शहरात सिमेंट काँक्रीटची घर आहे त्यामुळे माती सापडणं फार मुश्किल असतं. मात्र ग्रामीण भागात आजही काही घर मातीची वा जुन्या पद्धतीची आहेत. काही लाकडी खणांची घर आहेत त्यामुळे आपल्या अवती भवती किडे, मुंगी, विंचू, अळ्या किंवा सरपटणारी काही प्राणी हे सतत आढळत असतात. त्यांच्या मध्येच माणसांचे वावरण असतं आणि माणसांमध्ये या पशु या जनावरांचे वावरणं असतं. त्यामुळे जर एखादी अनपेक्षित घटना घडली तर त्यावरती काय उपचार करायचं हे तिथल्या स्थानिक लोकांना माहीत असतं. बऱ्याचदा साप चावणं असेल किंवा विंचू चावणं असेल किंवा दुसऱ्या आणखी काही गोष्टी असतील यावरती प्रथम घरच्या घरी उपचार केले जातात आणि त्यानंतर दवाखान्यामध्ये घेऊन गेल जाते.
पूर्वीच्या काळी जर एखादा विषारी प्राणी, किडा चावला तर अनेक औषध उपचार हे घरच्या घरी केली जायचे. जुने जाणते लवकर त्यावरती चांगल्या पद्धतीने झाडपाल्याची औषधे सुचवायचे त्याचा चांगला रिझल्ट देखील यायचं. यावरती माजी आमदार डॉक्टर तात्यासाहेब नातू यांनी अभ्यास करून औषधी शोधण्याची उल्लेखनीय कामगिरी देखील केली. या कोकणात विंचू, काळी इंगळी, हे चावण्याचे पूर्वीपासूनच अधिक प्रमाण आहेच ते प्रमाण आता कुठे कमी झाला आहे.
प्रत्येक ठिकाणी आता आधुनिकीकरण झाला आहे मात्र विंचू चावण्याची एक घटना संगमेश्वर तालुक्यातील घडली. या तीन वर्षाच्या चिमुकलीला विंचू चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिया गुरव वय वर्ष 3 असे या चिमुकलीचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पूर्व संदेलाच अत्यंत दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. सकाळी दारात खेळत असताना तीने दरवाजाच्या चौकटीवरती हार ठेवला. दरवाजावर असलेल्या त्या विंचूने तिच्या उजव्या हाताला दंश केला आणि ती अचानक रडायला लागली.
तिला दंश झाल्याने घरच्यांना लक्षात आलं तिच्यावर घरच्या घरी तात्काळ गावठी औषध उपचार सुरू केले. पण तिला उलट्या होऊन तिच्या नाकात तोंडातून लाळ गळू लागली. तिची प्रकृती अत्यंत बिघडत चालली त्यामुळे तिला जवळ असणाऱ्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी तिला डॉक्टरांनी तपासून तात्काळ उपचार करिता मोठ्या रुग्णालयात चिपळूण या ठिकाणी हलवण्यासाठी सांगितलं. तिथे तिच्यावरती औषध उपचार सुरू असताना तिचा काही वेळात मृत्यू झाला. विजय गुरव यांनी ही खबर संगमेश्वर पोलिसांना दिली या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांकडून या घटनेची माहिती घेण्याचं काम सुरू आहे.