हृदयद्रावक ! आई सोबत तो पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला ; पण ते दोघे परतेलेच नाही.

आज ही काही भागांमध्ये घर पोहोच पिण्याच पाणी नाही पाण्यासाठी विहिरी लांब कुठे तरी जाव लागत , पिण्याच पाणी आणण्यासाठी गेलीली महिला आणि तिचा मूलगा पुन्हा परतलेच नाही .
या घटनेत घराच्या अगदी जवळच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली
ही दुर्दैवी घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील डोंगरगण गावात घडली आहे. वर्षा भगवान शेंडे (वय 22) आणि आर्यन भगवान शेंडे (वय 2 अशी) अशी मृत मायलेकांची नावं आहेत. आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेंडे वस्तीवर राहत असलेल्या वर्षा शेंडे या पिण्याचं पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. यावेळी ही घटना घडली.
वर्षा शेंडे यांच्यासोबत त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आर्यन शेंडे हादेखील गेला होता. मात्र, विहीरीतून पाणी बाहेर काढताना त्यांचा तोल गेला आणि माय-लेक विहिरीत पडले. या घटनेत महिला आणि तिच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे.