Viral Video : शिक्षक रंगेहाथ पकडला; विद्यार्थ्या समोरच करत होता अस काही, पहा बातमी सविस्तर.

शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात मुलांच्या आयुष्यातला पहिला पालक हा त्यांचा शिक्षक असतो, कारण चांगलं वाईट खर खोट या जगाची ओळख करण्याचं महत्त्वाचं काम शिक्षकाकडून केलं जातं , त्यामुळे शिक्षकाची जी भूमिका विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षक विद्यार्थ्यांना जे संस्कार देतात त्यावरती देशाचे सुजाण नागरिक घडत असतात.
सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर कोणीतरी एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे आणि त्याला सोशल मीडियावर शेअर केला.
हा व्हिडीओ यूपीमधील हाथरसमधील असल्याची माहिती मिळत आहे.व्हिडीओत तुम्हाला आधी एका टेबलाच्या बाजूला दारूची बाटली दिसेल, त्यानंतर एक व्यक्ती दिसेल, जी खूर्चीवर बसली आहे आणि त्या व्यक्तीच्या मागे बिअरचा कॅन देखील आहे. तुम्हाला सुरुवातीला व्हिडीओ पाहून हे कळणार नाही की हा व्हिडीओ नक्की कुठला आहे. पण नंतर जेव्हा कॅमेरा फिरतो, तेव्हा तुम्हाला समोर शाळेच्या गणवेशात काही मुलं बसलेली दिसतात .
ज्यावर लोक भरभरुन कमेंट्स आणि शेअर करत आहेत. लोकांनी या शिक्षकाला खूपच ट्रोल केलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई करावी अशी अनेकांची मागणी आहे.हा शिक्षक वर्गातच दारु पित आहे. जे खरोखरंच खूप चुकीचं आहे