हृदयद्रावक घटना : लाकडी कपाटाने केला घात; ३ वर्षाच्या मुलासोबत घडले असे कि, डोळ्यातून पाणी येईल.
लहान मुलांच्या बाबतीत सर्वजण अतिशय हळवे असतात. घरातील प्रत्येक सदस्याचा जीव हा लहान मुलांमध्ये गुंतलेला असतो आपण बऱ्याचदा पाहतो तसेच ऐकतो की, घरामध्ये एक तरी लहान मुलं असावं ज्याने घरातलं वातावरण हे हसून खेळून राहते. घरात कायम त्या बाळाचा आवाज, कलकलाट कानावर पडत राहतो जेणेकरून घरातली वातावरण हे अगदी फ्रेश असते.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, लहान लेकरू हे अतिशय खेळकर स्वभावाचे असतात. त्याचप्रमाणे खोडकर देखील असतात आणि खेळताना किंवा खोड करत असताना बरेचसे नको त्या गोष्टी घडत असतात. जसे की, पडणे, एखादी वस्तू घेऊन खाली आपटणे, एखाद्या गोष्टीचा नुकसान करणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे पाहत असतो. पण नाशिकमध्ये एक अशी घटना घडली आहे की, जी ऐकल्यानंतर आपल्या अंगाला काटा येईल.
नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घडली आहे. असं म्हटलं जातं की, नियतीने घात केला आणि हसत्या खेळत्या जीवाचे अवघ्या तीन वर्षातच आयुष्य हिसकावून जाऊन घेतले. अगदी कालपर्यंत अवतीभवती, अंगा खांद्यावर खेळणार लेकरू आज काळाने त्याच्या आई वडिलांकडून हिरवून घेतलं. आपल्या लेकराचे या जगातून जाणं कोणत्याच आई-वडिलांना सहन होणार नाही. तसेच ही गोष्ट मान्य करणे खूप कठीण जाईल कधी स्वप्नातही असा विचार केला नसेल की, त्यांच्यासोबत ही अशी घटना घडेल.
नाशिक शहरातील जाधव संकुल परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबातील तीन वर्षाच्या मुलासोबत अतिशय भयंकर घटना घडली या मुलाच्या अंगावर करून लाकडी कपाट पडून या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मुलाचं वय अगदी तीन वर्ष आणि या बालकाचा करून अंत झाल्यामुळे परिसरात व्यक्त केली जात आहे शौर्य सुजित विश्वकर्मा असे या हृदय द्रावक दुर्घटनात मृत पावलेल्या तीन वर्षीय बालकाचे नाव.
कोणाच्याही मनाला अतिशय वेदना आणि चटके देणारी घटना विश्वकर्मा कुटुंबाच्या घरात घडली आहे. ही घटना पहाटे साडेसहा वा. दरम्यान घडली आहे. तीन वर्षाचा शौर्य साखर झोपेत असतानाच नशिबाने त्याच्यासोबत घात केला. पहाटेच्या साखर झोपेत बालमनाला पडणारी गोंडस स्वप्न असतात पण ते स्वप्न न पडता त्याच्या अंगावर भलेमोठे लाकडी कपाट पडले आणि त्याच वेळी त्याच्या आईवडिलांपासून नशिबाने त्यांचं मूल शौर्य हे हिरावून घेतले. त्याच्या अंगावर मोठी लाकडी कपाट पडल्याने त्याचा जागी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवसाची सकाळ पाहण्या अगोदरच झोपेतच असताना या बालकाच्या अंगावर कपाट पडून त्याचा मृत्यू झाला.
शौर्य या बालकाच्या अंगावर कपाट पडल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले. त्याचक्षणी त्याच्या पालकांनी मोठ्याने दवाखान्यामध्येच हंबर्डा फोडला. तीन वर्षाच्या बालकानी त्यांच्या आयुष्यातून जाणं हे त्यांना मान्य होणार नव्हते पण नियतीने या तीन वर्षाच्या बालकाला त्याच्या आईवडिलांपासून, त्याच्या कुटुंबापासून दूर गेले. या गोष्टीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. यापूर्वी देखील शहरांमध्ये अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत त्यामुळे लहान मुले असलेल्या घरातील पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा घटना आपल्या घरात घडणार नाही आणि आपल्या घरात हसणारे खेळणारे मुल आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही.