हृदय पिळवटून टाकणारा Video: फोटोच्या नादात आई-वडील पाण्यात वाहून गेले अन् चिमुरडी ‘मम्मी-मम्मी’ म्हणत…
सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहे. अशात घराबाहेर पडताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. विशेषत: पुरग्रस्त ठिकाणी अत्यावश्यक सावधगिरी बाळगणे,तरीसुद्धा काही लोकं नको ते धाडस करत असतात, ज्यामुळे त्यांना जीवदेखील गमवावा लागतो.
पुराच्या परिस्थितीत अनेक लोक फिरायला जाण्याचे प्लॅन रद्द करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक भलतं धाडस करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. फोटो काढण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे किती धोकादाक ठरु शकते याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आहे. जे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे त्यांच्या निष्काळजीपणामुळे पाण्यात वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. एक जोडपे पाण्याच्या जोरदार प्रवाहात दगडावर बसून मस्ती करत असल्याचं दिसत आहे. पाणी वारंवार दगडावर जोरात आदळत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
काही वेळाने मागून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येतो आणि त्या दोघांना खाली पाडतो, ज्यामुळे ते पाण्यातून वाहून जातात. हे दोघे पाण्यातून वाहत जात असताना त्यांची मुलगी मोठ्याने ‘मम्मी-मम्मी’ असं ओरडत असल्याचंही व्हिडीओत ऐकायला येत आहे. व्हिडिओमधील पाण्याचा प्रवाह पाहून तुम्हीही घाबरून जाल. पण अशा परिस्थितीतदेखील हे जोडपे पाण्याच्या प्रवाहात मस्ती करत होते.
लोकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. तसेच पुराच्या पाण्यात जाऊ नये असंही सांगण्यात येत आहे.